esakal | ब्रिटनच्या काँटाची ऐतिहासिक वाटचाल
sakal

बोलून बातमी शोधा

ब्रिटनच्या काँटाची ऐतिहासिक वाटचाल

ब्रिटनच्या काँटाची ऐतिहासिक वाटचाल

sakal_logo
By
पीटीआय

ब्रिटनच्या योहाना काँटाने फ्रान्सच्या कॅरोलीन गार्सियाला ७-६ (७-३), ४-६, ६-४ असे हरविले. महिला एकेरीत विंबल्डनची उपांत्यपूर्व फेरी गाठलेली ती १९८४ नंतर पहिलीच महिला ठरली. तेव्हा ज्यो डूरी हिने ही कामगिरी केली होती. काँटाला यापूर्वी पाच वेळा सहभागी होताना केवळ एकच सामना जिंकता आला होता. ४० वर्षांपूर्वी व्हर्जिनिया वेड यांनी विंबल्डन विजेतेपद मिळविले होते. त्यांच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची संधी काँटाला आहे.

सिमोनाने व्हिक्‍टोरिया अझारेन्काचे आव्हान ७-६ (७-३), ६-२ असे परतावून लावले.

महिला एकेरी -
उपांत्यपूर्व लढती

गार्बीन मुगुरुझा (स्पेन १४) वि. स्वेतलाना कुझ्नेत्सोवा (रशिया ७)
मॅग्डलेना रिबॅरीकोवा (स्लोव्हाकिया) वि. कोको वॅंडेवेघे (अमेरिका २४)
व्हीनस विल्यम्स (अमेरिका १०) वि. जेलेना ऑस्टापेन्को (लॅट्विया १३)
योहाना काँटा (ब्रिटन) ६ वि. सिमोना हालेप (रुमानिया) २

loading image