वार्षिक कबड्डी पुरस्कारांमध्ये पुण्याचा वरचष्मा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

पुणे - महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात पुणे जिल्हा संघटनेचा वरचष्मा राहिला आहे. सर्वोत्कृष्ट जिल्हा संघटनेसह पुण्याचा विकास काळे सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी दिल्या जाणाऱ्या स्व. मधुसूदन पाटील पुरस्काराचा मानकरी ठरला आहे.

कबड्डी महर्षी स्व. बुवा साळवी यांचा जन्म दिन (१५ जुलै) राज्य कबड्डी संघटनेच्या वतीने ‘कबड्डी दिन’ म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी हा पुरस्कार वितरण सोहळा या वेळी नाशिक येथे होणार आहे. 

गेल्या वर्षी सहा पैकी पाच विजेतीपदे मिळवणारी पुणे जिल्हा कबड्डी संघटना सर्वोत्कृष्ट संघटना ठरली आहे. त्याचवेळी विविध पुरस्कारांमध्ये पुण्याच्या पायल वसावे, राधा मोरे, ऋतुजा लांडे, बबलू गिरी या कुमार खेळाडूंबरोबरच मंगेश भगत आणि सायली केरिपाळे या वरिष्ठ आणि नामदेव तापकिर या ज्येष्ठ खेळाडूचा समावेश आहे. महिलांमध्ये दिला जाणारा स्व. अरुणा साटम स्मृती पुरस्कार मुंबई उपनगरच्या कोमल देवकर हिला जाहीर झाला आहे. 

खेळाडूंसह ज्येष्ठ कार्यकर्ता, ज्येष्ठ पंच, क्रीडा पत्रकार, कृतज्ञता पुरस्कार हे अन्य पुरस्कारही या वेळी दिले जाणार आहेत. पुरस्कार सोहळा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news kabaddi