शिस्तभंग कारवाईनंतरही रबाडाचा संघात समावेश

वृत्तसंस्था
सोमवार, 19 मार्च 2018

जोहान्सबर्ग - शिस्तभंग कारवाईच्या शक्‍यतेनंतरही दक्षिण आफ्रिका संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यासाठी कगिसो रबाडाचा संघात समावेश केला आहे. अर्थात त्याच्यावर असलेल्या कारवाईच्या टांगत्या तलवारीमुळे त्यांनी डुआने ऑलिव्हर आणि ख्रिस मॉरिस या अन्य दोन वेगवान गोलंदाजांनाही संघात स्थान दिले आहे. शिस्तभंगाच्या कारवाईला रबाडाने आव्हान दिले आहे. त्यावर सोमवारी न्यूझीलंडच्या न्यायिक आयोगाचे प्रमुख मायकेल हेरॉन टेलिकॉन्फरन्सद्वारे सुनावणी करणार आहेत. त्याचा अहवाल ४८ तासांत अपेक्षित आहे. तिसरा कसोटी सामना गुरुवारी (ता. २२) सुरू होणार आहे.

जोहान्सबर्ग - शिस्तभंग कारवाईच्या शक्‍यतेनंतरही दक्षिण आफ्रिका संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यासाठी कगिसो रबाडाचा संघात समावेश केला आहे. अर्थात त्याच्यावर असलेल्या कारवाईच्या टांगत्या तलवारीमुळे त्यांनी डुआने ऑलिव्हर आणि ख्रिस मॉरिस या अन्य दोन वेगवान गोलंदाजांनाही संघात स्थान दिले आहे. शिस्तभंगाच्या कारवाईला रबाडाने आव्हान दिले आहे. त्यावर सोमवारी न्यूझीलंडच्या न्यायिक आयोगाचे प्रमुख मायकेल हेरॉन टेलिकॉन्फरन्सद्वारे सुनावणी करणार आहेत. त्याचा अहवाल ४८ तासांत अपेक्षित आहे. तिसरा कसोटी सामना गुरुवारी (ता. २२) सुरू होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर रबाडावरील कारवाई शिथिल होईल या आशेवर दक्षिण आफ्रिका संगाने त्याचा संघात समावेश केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news Rabada Johannesburg