esakal | किर्गिओसची अंतिम फेरीत धडक
sakal

बोलून बातमी शोधा

किर्गिओसची अंतिम फेरीत धडक

किर्गिओसची अंतिम फेरीत धडक

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मॅसन ओहायो - ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओस याने आपली घोडदौड कायम राखत सिनसिनाटी ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. स्पेनच्या रॅफेल नदालला धक्का दिल्यानंतर उपांत्य फेरीत त्याने स्पेनच्याच डेव्हिड फेरेर याचे आव्हान संपुष्टात आणले.

नदालविरुद्ध सहज विजय मिळविणाऱ्या किर्गिओसला फेरेरविरुद्ध मात्र विजयासाठी झगडावे लागले. त्याने लढत ७-६(७-३), ७-६(७-४) अशी जिंकली. 
किर्गिओसने १४ बिनतोड सर्व्हिस केल्या. पण, त्यानंतरही त्याला आपल्या सर्व्हिसवर नियंत्रण राखता येत नव्हते. त्याने केलेल्या चुकांचा फायदा उठविण्यात फेरेर अपयशी ठरला. दोघांनी प्रत्येकी तीन ब्रेक पॉइंट मिळविले. त्यामुळे लढतीत मिळविलेल्या या ब्रेकचा तसा फायदा झाला नाही. दोन्ही सेट टायब्रेकरमध्ये गेले. तेथे मात्र किर्गिओसने बाजी मारली.