80 वी टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा; आनंदचा सलग दुसरा विजय

केदार लेले
शनिवार, 27 जानेवारी 2018

'ब' गटात विदित गुजरातीची संयुक्त आघाडी कायम
ब' गटामध्ये संयुक्त आघाडीवर असणाऱ्या विदीत गुजराती आणि कोरोबॉव यांच्यातील लढत बरोबरीत सुटली. ही लढत बरोबरीत सुटल्यामुळे विदीत गुजराती आणि कोरोबॉव यांची संयुक्त आघाडी कायम राहिली आहे. अकरा फेऱ्यांमध्ये विदीत गुजराती आणि कोरोबॉव यांचे साडेसात गुण झाले आहेत.

विक अॅन झी (हॉलंड) : उत्कंठापूर्ण अकराव्या फेरीत तीन डाव निर्णायक ठरले तर उर्वरित चार डाव बरोबरीत सुटले. बुद्धिबळ प्रेमींना तीन निर्णायक डावांची मेजवानी देताना, पांढर्‍या मोहर्‍यांनी खेळणार्‍या आनंद, कॅराकिन आणि वेस्ली सो यांनी पूर्ण गुण वसूल केले. अनुक्रमे हू यिफान, क्रॅमनिक आणि गॅविन जोन्स यांना पराभव स्वीकारावा लागला.

आनंदचे स्पर्धेत सुरेख पुनरागमन!
भारताच्या विश्वनाथन आनंदने ८०वी टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत शुक्रवारी सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. या स्पर्धेत गेल्या शनिवारी क्रॅमनिक विरुद्ध पराभूत झाल्यामुळे आनंद काहीसा पिछाडीवर पडला होता.
 
अनुक्रमे १०व्या फेरीत गॅविन जोन्स आणि ११व्या फेरीत हू यिफान ला पराभूत करीत त्याने सलग दोन विजयांची नोंद केली.

सलग दोन विजय नोंदवत आनंदने या स्पर्धेत सुरेख पुनरागमन केले आहे. या स्पर्धेत अद्याप दोन फेऱ्या बाकी आहेत आणि आनंद सर्वात जवळच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा फक्त अर्ध्या गुणाने मागे आहे.

मामेद्यारोव, कार्लसन आणि अनिष गिरी यांची संयुक्त आघाडी
मामेद्यारोव, कार्लसन आणि अनिष गिरी साडेसात गुणांसह आघाडीवर आहेत. तर सात गुणांसह आनंद दुसऱ्या स्थानावर आहे! तो मामेद्यारोव, कार्लसन आणि अनिष गिरी यांच्यापेक्षा केवळ अर्धा गुण मागे आहे.

'ब' गटात विदित गुजरातीची संयुक्त आघाडी कायम
ब' गटामध्ये संयुक्त आघाडीवर असणाऱ्या विदीत गुजराती आणि कोरोबॉव यांच्यातील लढत बरोबरीत सुटली. ही लढत बरोबरीत सुटल्यामुळे विदीत गुजराती आणि कोरोबॉव यांची संयुक्त आघाडी कायम राहिली आहे. अकरा फेऱ्यांमध्ये विदीत गुजराती आणि कोरोबॉव यांचे साडेसात गुण झाले आहेत.

शनिवारी अशी रंगेल बारावी फेरी
आनंद वि. वेस्ली सो
अनिष गिरी वि. अधिबन भास्करन 
गॅविन जोन्स वि. मामेद्यारोव
मॅग्नस कार्लसन वि. मॅटलॅकॉव
क्रॅमनिक वि. कारुआना
पीटर स्विडलर वि. सर्जी कॅराकिन
हू यिफान वि. वे यी

Web Title: sports news tata steel chess competition