esakal | रावत, सुंदरची आगेकूच
sakal

बोलून बातमी शोधा

रावत, सुंदरची आगेकूच

रावत, सुंदरची आगेकूच

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत भारताच्या पाचव्या मानांकित सिद्धार्थ रावतने रशियाच्या बिगर मानांकित शाल्वा झानाशियाचा, तर एन. विजय सुंदर प्रशांतने सिद्धात बांठियाचा पराभव करत पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश करण्याच्या आपल्या आशा उंचावल्या.

म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात एमएसएलटीए स्कूल ऑफ टेनिस कोर्टवर सुरू झालेल्या या स्पर्धेत भारताच्या पाचव्या मानांकित सिद्घार्थ रावतने रशियाच्या बिगर मानांकित शाल्वा झानाशियाचा चुरशीच्या लढतीत ४-६, ७-५, ६-२ असा पराभव केला.  सातव्या मानांकित एन. विजय सुंदर प्रशांतने वाइल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळविलेल्या सिद्धांत बांठियाचा रंगतदार सामन्यात ६-२, ४-६, ६-१ असा पराभव केला. 

निकाल - दुसरी पात्रता फेरी -  काईची उचिडा (जपान) वि. वि. चंद्रील सुद (भारत) ६-०, ६-१, बोर्ना गोजो वि. वि. क्‍लेमेंट जिन्स (बेल्जियम) ७-५, ६-३, ॲनटोनी इस्कोफिर (फ्रान्स) वि.वि. जयेश पुंगालिया (भारत) ६-३, ६-१, हुगो ग्रेनिअर (फ्रान्स) वि.वि. मतेज सबानो ६-७, ७-६, ६-३, सिद्धार्थ रावत (भारत) वि.वि. शाल्वा झानाशिया (रशिया) ४-६, ७-५, ६-२, एन. विजय सुंदर प्रशांत (भारत) वि.वि. सिद्धांत बांठिया (भारत) ६-२, ४-६, ६-१, तिमुर खाबिबुलीन (कझाकस्तान) वि.वि. लक्षीत सुद (भारत) ६-४, ६-४. 

loading image