esakal | विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेला सर्वाधिक दर्शक कोलकत्यात
sakal

बोलून बातमी शोधा

विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेला सर्वाधिक दर्शक कोलकत्यात

विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेला सर्वाधिक दर्शक कोलकत्यात

sakal_logo
By
पीटीआय

कोलकता - भारतात पार पडलेल्या विश्‍वकरंडक (१७ वर्षांखालील) फुटबॉल स्पर्धेत सर्वाधिक प्रेक्षकांची उपस्थिती कोलकाता येथेच नोंदली गेली. कोलकताच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीच आपल्या फेसबुक पेजवरून ही माहिती दिली आहे.

भारतात विश्‍वकरंडक स्पर्धेला झालेल्या एकूण गर्दीपैकी ४५ टक्के गर्दी ही फक्त कोलकता येथील साल्ट लेक स्टेडियवर झाली होती. दुसऱ्या क्रमांकाची दर्शक उपस्थिती नवी दिल्लीत (१९.७८ टक्के) राहिली. पण, कोलकता त्यांच्या किती तरी पुढे होते. या कुमारांच्या विश्‍वकरंडक स्पर्धेला भारतात एकूण १३ लाख ४७ हजार दर्शकांनी उपस्थिती लावली हाती. यात कोलकता येथे एकूण सहा लाख ८ हजार दर्शकांची विक्रमी उपस्थिती राहिली होती. प्रत्येक सामन्यास सरासरीनुसार भारतात २५९०६ दर्शकांनी उपस्थिती लावली. कोलकताच्या उपस्थितांची सरासरी दुपटीहून अधिक होती. कोलकत्यात प्रत्येक सामन्यास साधारण सरासरी ५५३४५ इतकी गर्दी राहिली होती.

loading image
go to top