esakal | स्पेनचा नायजरवर दमदार विजय
sakal

बोलून बातमी शोधा

स्पेनचा नायजरवर दमदार विजय

स्पेनचा नायजरवर दमदार विजय

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोची - स्पेनने विश्वकरंडक १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेतील गोलांचे शतक पूर्ण करताना नायजरविरुद्ध ४-० असा विजय मिळविला. या सफाईदार विजयामुळे स्पेनने सलामीची लढत जिंकलेल्या नायजरला मागे टाकत दुसरा क्रमांकही मिळविला. लिओनेल मेस्सीच्या बार्सिलोनाचा आक्रमक अबेल रुईझ याने दोन गोल करीत स्पेनच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. स्पेनने सरस गोलसरासरीवर निगेरला मागे टाकले आहे. त्यांचे आता या स्पर्धेच्या इतिहासात एकूण १०२ गोलही झाले आहेत. स्पेनला स्थिरांवण्यास वेळ लागला; पण गाफील नायजर बचावाचा फायदा घेत रुईझने २१ व्या मिनिटास खाते उघडले; तसेच ४१ व्या मिनिटास रिबाउंड किकवर आघाडी वाढवली.

loading image
go to top