esakal | पहिल्या लढतीत इटलीचा पराभव
sakal

बोलून बातमी शोधा

सोल्ना (स्वीडन) - विश्‍वकरंडक फुटबॉल प्ले ऑफ लढतीत इटलीविरुद्ध एकमात्र विजयी गोल केल्यावर सहकाऱ्यांसह जल्लोष करताना स्विडनाचा जेकब जोहान्सन (जर्सी नं. १३)

पहिल्या लढतीत इटलीचा पराभव

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

स्टॉकहोम - चारवेळच्या विजेत्या इटलीच्या आगमी विश्‍वकरंडक स्पर्धेतील सहभागाला धक्का बसला आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेच्या पात्रता फेरीनंतर झालेल्या पहिल्या प्ले-ऑफ लढतीत त्यांनी स्वीडनकडून ०-१ असा पराभव पत्करावा लागला. साठ वर्षांत प्रथमच इटलीचा विश्‍वकरंडक सहभाग धोक्‍यात आला आहे.

राखीव खेळाडू म्हणून उतरलेल्या जेकब जोहान्सन याने सामन्याच्या ६१व्या मिनिटाला स्वीडनसाठी एकमात्र गोल केला. ‘होम आणि अवे’ धर्तीवर प्ले-ऑफ लढती खेळविल्या जाणार आहेत. त्यामुळे आता सोमवारी घरच्या मैदानावर केळताना इटगिआन पिएरो व्हेंच्युरा यांच्या इटली संघाला आपले सर्वस्व पणाला लावून मोठा विजय मिळवावा लागेल. विश्‍वकरंडक स्पर्धेच्या इतिहासात इटली १९५८ मध्ये केवळ एकदाच विश्‍वकरंडकासाठी अपात्र ठरले आहेत. 

व्हेंच्युरा यांना अजूनही इटली पात्र ठरण्याच्या आशा आहेत. ते म्हणाले, ‘‘आज आम्ही खराब खेळ केला. आम्हाला आता आमच्या क्षमतेपलीकडे जाऊन सर्वोत्तम खेळ करावा लागेल. त्यासाठी अजून ९० मिनिटे बाकी आहेत. आम्हाला आशा आहेत. पहिल्या सामन्यात आम्ही सुरवातीला गोल करू शकलो असतो, तर चित्र वेगळे दिसले असते.’’

पेरू विजयापासून दूर
प्ले-ऑफच्याच न्यूझीलंडमध्ये वेलिंग्टन येथे झालेल्या अन्य एका सामन्यात पेरूला यजमान न्यूझीलंडवर विजय मिळविण्यात अपयश आले. शनिवारी झालेला पेरू-न्यूझीलंड सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. आता परतीच्या लढतीत जिंकणारा संघ विश्‍वकरंडकासाठी पात्र ठरेल.

loading image
go to top