Sakal Premier League 2025
sakal
क्रीडा
Sakal Premier League 2025: नोव्हेंबरमध्ये सकाळ प्रिमिअर लीगचा थरार; विजेत्या संघाला दोन लाखांचा पुरस्कार, ३२ संघांचा राहणार सहभाग
Sakal Premier League 2025 Announced in Nagpur: ‘सकाळ प्रीमियर लीग’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला २३ नोव्हेंबरपासून नागपुरात सुरुवात होणार आहे. देशभरातील ३२ संघ या स्पर्धेत सहभागी होत असून विजेत्याला दोन लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.
नागपूर : विदर्भातील क्रिकेटपटूंसाठी ‘सकाळ’ ने एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून येत्या २३ नोव्हेंबरपासून सकाळ प्रिमिअर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेची घोषणा केली आहे. अखिल भारतीय स्तरावर असलेल्या या स्पर्धेत विजेत्या संघाला दोन लाखांचा पुरस्कार देण्यात येणार असून अन्य आकर्षक वैयक्तिक पुरस्कारही देण्यात येणार आहे.

