Sri lanka crisis: भारत स्वीकारणार आशिया कपचं यजमानपद? गांगुलीने दिलं उत्तर

देशातील आर्थिक महामारीमुळे तेथील नागरिकांनी राष्ट्रपती भवनावर हल्ला केला होता. अशा परिस्थितीत आशिया चषक 2022 च्या यजमानपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
Sourav Ganguly
Sourav Gangulyesakal

sri lanka crisis : भारताचा शेजारी देश श्रीलंकेतील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. श्रीलंकेत आणीबाणीच्या काळात आता राजकीय संकटही निर्माण झाले आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी देशातील आर्थिक महामारी आणि जनतेच्या रोषामुळे देशातून पलायन केलं आहे. देशातील आर्थिक महामारीमुळे तेथील नागरिकांनी राष्ट्रपती भवनावर हल्ला केला होता. अशा परिस्थितीत आशिया चषक 2022 च्या यजमानपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

श्रीलंका देश मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे, जिथे लोक मूलभूत गरजांसाठी झगडत आहेत अशा वेळी श्रीलंका स्पर्धेचे आयोजन करू शकेल का? आणि श्रीलंका नाही तर, भारत या कार्यक्रमाचे यजमानपदासाठी पर्यायी जागा देईल का? (india host the asia cup 2022 bcci president sourav ganguly)

Sourav Ganguly
Eng vs Ind 2nd ODI Live: हार्दिकने दिला इंग्लंडला पहिला धक्का

श्रीलंकेतील सध्याच्या राजकीय आणि आर्थिक संकटात परिस्थितीवर लक्ष ठेवत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी गुरुवारी एएनआयला सांगितले की, सध्या मी यावर काही भाष्य करू शकत नाही. आम्ही लक्ष ठेवू आहे श्रीलंकेच्या परिस्थितीवर, ऑस्ट्रेलिया आता तिथे खेळत आहे. श्रीलंकेचा संघही चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे मी यावर भाष्य करू शकत नाही.

Sourav Ganguly
जयसूर्या पाठोपाठ संगकारासुद्धा उतरला आंदोलनात, 'भविष्यासाठी..'

ऑस्ट्रेलियाने त्यांचा एक महिन्याचा श्रीलंका दौरा संपवला आहे. ऑस्ट्रेलियाने टी-20 मालिका 2-1 ने जिंकली. श्रीलंकेने एकदिवसीय मालिका 3-2 अशी जिंकली आणि कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली. आता 16 जुलैला दोन सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका पाकिस्तानचे यजमानपद भूषवणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com