बांगलादेशविरुद्ध श्रीलंका संघाची घोषणा, दिमुथ करुणारत्नेकडं पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी I Sri Lanka vs Bangladesh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sri Lanka vs Bangladesh Test Series

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीनं हा दौरा श्रीलंकेसाठी खूप महत्त्वाचा आहे.

बांगलादेशविरुद्ध श्रीलंका संघाची घोषणा, करुणारत्नेकडं पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Sri Lanka vs Bangladesh Test Series : श्रीलंका क्रिकेट मंडळानं (Sri Lanka Cricket Board) बांगलादेशविरुद्धच्या (Bangladesh) दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी 18 खेळाडूंची घोषणा केलीय. सलामीवीर दिमुथ करुणारत्नेकडे (Dimuth Karunaratne) पुन्हा एकदा संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. मात्र, काही महत्त्वाच्या खेळाडूंना या संघात स्थान मिळालेलं नाहीय. श्रीलंकेचा फलंदाज रोशन सिल्वा बांगलादेश दौऱ्यातून बाहेर पडलाय. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 15 मे पासून चितगाव इथं, तर दुसरा सामना 23 मे पासून ढाका इथं खेळवला जाणार आहे.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) दृष्टीनं हा दौरा श्रीलंकेसाठी खूप महत्त्वाचा आहे. सध्या संघ पाचव्या क्रमांकावर आहे. 2021-23 दरम्यान संघानं दोन सामने जिंकले आहेत आणि दोन सामन्यांमध्ये बरोबरीवर समाधान मानावं लागलंय. यादरम्यान बांगलादेशनं केवळ एक कसोटी सामना जिंकलाय. सध्या हा संघ यादीत 8 व्या क्रमांकावर आहे.

अनकॅप्ड खेळाडूंना संघात स्थान

आपल्या युवा खेळाडूंवर विश्वास व्यक्त करत श्रीलंका क्रिकेट बोर्डानं या दौऱ्यासाठी संघात तीन अनकॅप्ड खेळाडूंचाही समावेश केलाय. कामिल मिशहारा, दिलशान मदुशंका आणि सुमिंदा लक्षण यांना या यादीत स्थान मिळालंय.

'या' खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता

या दौऱ्यात अनेक वरिष्ठ खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला नाहीय. लाहिरू थिरिमाने, चरित अस्लंका, लाहिरू कुमारा, दुष्मंथा चमीरा आणि जेफ्री वेंडरसे यांना वगळण्यात आलंय. दुष्मंथा चमीरा सध्या आयपीएल खेळत असून लखनऊ सुपरजायंट्सच्या नवीन संघाचा तो भाग आहे.

श्रीलंकेचा 18 जणांचा संघ

दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), कामिल मिशहारा, ओशादा फर्नांडो, अँजेलो मॅथ्यूज, कुसल मेंडिस, धनंजय डी सिल्वा, कामिंदू मेंडिस, निरोशन डिकवेला, दिनेश चंडीमल, रमेश मेंडिस, चमिका करुणारत्ने, सुमिंदा लक्षण, कसुन रजिथा, विश्वा फर्नांडो, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका, प्रवीण जयविक्रमा आणि लसिथ एम्बुल्डेनिया.