SL vs PAK : पाकिस्तानचा अब्दुल्ला सुनिल गावसकर क्लबमध्ये सामिल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sri Lanka Vs Pakistan Abdullah Shafique Join Sunil Gavaskar Club Create Plenty Of Records

SL vs PAK : पाकिस्तानचा अब्दुल्ला सुनिल गावसकर क्लबमध्ये सामिल

SL vs PAK : पाकिस्तानने श्रीलंकेविरूद्धच्या (Sri Lanka Vs Pakistan) पहिल्या कसोटी सामन्यात 4 विकेट राखून विजय मिळवला. पाकिस्तानने चौथ्या डावात 342 धावांचे आव्हान पार केले. या विजयाचा शिल्पकार सलामीला येत नाबाद 160 धावांची खेळी करणारा अब्दुल्ला शफिक (Abdullah Shafique) ठरला. सामना जिंकून देणारी खेळी करणारा अब्दुल्ला आता भारताचे दिग्गत माजी कर्णधार सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांच्या क्लबमध्ये सामिल झाला आहे.

हेही वाचा: 'मी ODI मधून निवृत्ती घेतली त्यांनी T20 मधून बॅन केलं'

पाकिस्तानच्या अब्दुल्ला शफीकचा हा 6 वा कसोटी सामना होता. त्यात त्यांनी 80 च्या सरासरीने 720 धावा केल्या आहेत. यानंतर तो 6 कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत पाकिस्तानच्या जावेद मियांदाद यांना देखील मागे टाकले आहे. अब्दुल्ला 6 कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत आता चौथ्या स्थानावर आहे. या यादीत सुनिल गावसकर हे 912 धावा करून अव्वल स्थानावर आहेत.

हेही वाचा: आफ्रिकेतील टी 20 लीग टीम लिलावात IPL फेंचायजींचा 'व्हाईट वॉश'

चौथ्या डावत 400 पेक्षा जास्त चेंडूंचा सामना

शफीक अथर्टन, सटक्लिफ, गावसकर आणि बाबर आजम यांच्यानंतर कसोटीच्या चौथ्या डावात 400 पेक्षा जास्त चेडूंचा सामना करणारा 5 वा फलंदाज ठरला.

आशियातील कसोटी सामन्यात चौथ्या डावात यशस्वी धावांचा पाठलाग करताना अब्दुल्लाने 160 धावा केल्या होत्या. हा आशियातील कसोटी सामन्यात चौथ्या डावात केलेला तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा होत्या. यापूर्वी काईल मेयर्सने बांगलादेश विरूद्ध नाबाद 210 धावा तर श्रीलंकेविरूद्ध युनिस खानने नाबाद 171 धावा केल्या होत्या.

हेही वाचा: ICC ODI Rankings : जसप्रीत बुमराहचा अव्वल क्रमांक कोणी हिसकावला?

500 पेक्षा जास्त मिनिटे खेळपट्टीवर

अब्दुल्ला कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी धावांचा पाठलाग करताना 500 मिनिटांपेक्षा जास्त काळ खेळपट्टीवर घालवणारा पहिला फलंदाज ठरला. तो खेळपट्टीवर 524 मिनिटे खेळत होता.

नाबाद परतलेला फलंदाज

चौथ्या डावात 300 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करताना अब्दुल्ला नाबाद राहिला होता. अशी कामगिरी करणारा तो वेस्ट इंडीजच्या गॉर्डन ग्रीनिज यांच्यानंतरचा दुसराच फलंदाज ठरला.

Web Title: Sri Lanka Vs Pakistan Abdullah Shafique Join Sunil Gavaskar Club Create Plenty Of Records

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top