नियम मोडला! लंकेच्या त्रिकूटावर वर्षभर 'होम क्वारंटाईन'ची वेळ

विना मास्क स्मोकिंग करत रस्त्यावर फिरत असल्याचा त्यांचा एक व्हिडिओ समोर आला होता.
Mendis and Dickwella
Mendis and Dickwella Twitter
Updated on

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (Sri Lanka Cricket Board) इंग्लंड दौऱ्यावर बायोबबलचे उल्लंघन करणाऱ्या आपल्या खेळाडूंवर कठोर कारवाई केल्याचे वृत्त आहे. कुशल मेंडिस (Kusal Mendis), निरोशन डिक्वेला (Niroshan Dickwella) आणि दनुष्का गुणातिलका (Danushka Gunathilaka) यांना एक वर्ष क्रिकेटला मुकावे लागण्याची शक्यता आहे. श्रीलंकेचा क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. टी-20 मालिकेदरम्यान या खेळाडूंनी बायोबबल नियमाचे उल्लंघन केले होते. विना मास्क स्मोकिंग करत रस्त्यावर फिरत असल्याचा त्यांचा एक व्हिडिओ समोर आला होता. (Sri Lankas Mendis Dickwella Gunathilaka dropped from India series likely to face 1 year bans)

Mendis and Dickwella
Video : मैदानावर स्टार प्लेयर तर स्टेडियममध्ये त्यांच्या आया भांडल्या

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या स्पर्धा सुरु आहेत त्या बायो बबल वातावरणात घेण्यात येत आहेत. खेळाडूंना हॉटेल सोडून बाहेर फिरण्यास परवानगी नाही. 'धुवा' उडवण्याच्या नादात कोरोना प्रोटोकॉलचा विसर पडणे, खेळाडूंना चांगलेच अंगलट येणार आहे. AFP ने दिलेल्या वृत्तानुसार, या खेळा़डूंना भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 आणि वनडे मालिकेतूनही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यांना एक वर्षांच्या बंदीस सामोरे जावे लागू शकते. यासंदर्भात अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

इंग्लंड दौऱ्यावर श्रीलंकेचा संघ संघर्ष करताना दिसत आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत श्रीलंकेला 3-0 अशा दारुण पराभवाला समोरे जावे लागले होते. इंग्लंड विरुद्धच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेनंतर कुशल मेंडिस, निरोशन डिक्वेला आणि दनुष्का गुणातिलका यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात श्रीलंकन त्रिकूट लपून छपून रस्त्यावर फिरताना सिगारेट ओढताना दिसले होते. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांना मायेदेशी बोलवून घेण्यात आले होते. याप्रकरणाचा तपास करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली होती.

इंग्लंड विरुद्धच्या टी-20 मालिकेसह वनडेतही श्रीलंकेची सुरुवात खराब झालीये. त्यात आता संघातील प्रमुख खेळाडू मायदेशात होणाऱ्या भारताविरुद्धच्या टी-20 आणि वनडे मालिकेलाही मुकणार आहेत. कोरोनाच्या नियमाचे उल्लंघन करुन खेळाडूंनी स्वत:सह संघाच्या अडचणी वाढवण्याचे काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com