
Euro 2020 : वर्ल्ड कप विजेत्या फ्रान्सला स्वित्झलंड विरुद्धच्या सामन्यात धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. निर्धारित वेळेतील अखेरच्या 10 मिनिटा अगोदर करीम बेंझमा आणि पॉल पोगबा यांच्या गोलमुळे फ्रान्सच्या संघाने 3-1 अशी आघाडी मिळवली होती. पण त्यानंतर 81 व्या मिनिटाला हॅरिस सेफरोविच आणि 90 व्या मिनिटाला मारिओ गेव्हरनोविच याने डागलेल्या गोलमुळे स्वित्झर्लंडने सामन्यात बरोबरी साधली. एक्स्ट्रा टाईमनंतरही सामना 3-3 बरोबरीत सुटल्यानंतर पेनल्टी शूट आउटमध्ये फ्रान्सच्या पदरी पराभवाची नामुष्की ओढावली. (France star players Rabiot and Pogba and Mbappe mothers involved in fight after Euro 2020 exit)
स्वित्झर्लंडच्या गॅव्हरनोविचनं केलल्या गोलसाठी फ्रान्स स्टार अॅड्रियन राबीओ याने पॉल पोगबाला जबाबदार धरले. त्यावरुन मैदानात या दोघांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचेही पाहायला मिळाले. फ्रान्सच्या या दोन स्टार फुटबॉलपटूंचा मैदानावरील एकमेकांवरचा त्रागा इथेच थांबला नाही. फ्रान्सच्या पराभवानंतर VIP स्टँडमध्ये मॅच पाहण्यासाठी बसलेल्या दोघांच्या कुटुंबियातही यावरुन शाब्दिक वाद रंगल्याचे पाहायला मिळाले.
अॅड्रियन राबीओ याची आई वेरोनिक राबीओ (Veronique Rabiot ) यांनी पोगबा आणि एम्बापेच्या कुटुंबियांसोबत हुज्जत घातली. फ्रान्सच्या पराभवानंतर व्हीआयपी गॅलरीतला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात राबीओट याची आई पोगबा आणि एम्बापेच्या कुटुंबियांवर भडकल्याचे पाहायला मिळते. पोगबाच्या चुकीमुळे स्वित्झर्लंडला तिसरा आणि मॅचमध्ये बरोबरी साधणारा गोल मिळाला, असे अॅड्रियन राबीओला वाटते. हा गोल वर्ल्ड चॅम्पियन फ्रान्सला चांगलाच महागात पडला.
एक्स्ट्रा टाईममध्ये सामना 3-3 असा बरोबरीत राहिल्यानंतर युरोतील पहिला सामना पेनल्टी शूट आउटमध्ये गेला. यावेळी स्वित्झर्लंडच्या खेळाडूंनी संधीच सोनं करत पाच यशस्वी किक मारत गोल पोस्ट भेदले. दुसरीकडे फ्रान्सकडून अखेरची किक मारताना एम्बापे अपयशी ठरला आणि स्वित्झर्लंडने क्वार्टर फायनल गाठली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.