Asian Aquatics 2025: नटराजची ऐतिहासिक पदकांना गवसणी; आशियाई जलतरण, १६ वर्षांनंतर यश
Srihari Nataraj: श्रीहरी नटराजने आशियाई ॲक्वॅटिक्स जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत २०० मीटर फ्रीस्टाइल व ५० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रौप्यपदक पटकावत इतिहास रचला. भारताला तब्बल १६ वर्षांनंतर जलतरणात पदकाची कमाई झाली.
अहमदाबाद : श्रीहरी नटराज याने आशियाई ॲक्वॅटिक्स या जलतरण अजिंक्यपद स्पर्धेमध्ये ऐतिहासिक पदके पटकावताना भारताचा झेंडा दिमाखात फडकवला. त्याने पुरुषांच्या २०० मीटर फ्रीस्टाइल जलतरण शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली.