Canada Open 2025: किदांबी श्रीकांतचे आव्हान संपुष्टात; कॅनडा ओपन बॅडमिंटन, एकेरीतील उपांत्य फेरीत पराभव
Badminton Semifinals: कॅनडा ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा किदांबी श्रीकांत उपांत्य फेरीत पराभूत झाला. जपानच्या निशिमोटोने निर्णायक गेममध्ये बाजी मारली. इतर भारतीय खेळाडूंनाही हार पत्करावी लागली.
कॅलगॅरी : भारताचा अनुभवी खेळाडू किदांबी श्रीकांत याचे कॅनडा ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. जपानच्या केंटा निशिमोटो याच्याकडून त्याला एकेरीत पराभवाचा सामना करावा लागला.