स्टेडियमचे नाव जेटली होणार, मैदानाचे नाव कोटलाच; DDCAचा खुलासा

वृत्तसंस्था
Wednesday, 28 August 2019

भाजप नेते व दिल्ली क्रिकेट संघटनेचे (डीडीसीए) दीर्घकाळ अध्यक्ष असलेले दिवंगत माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे नाव फिरोजशाहा कोटला स्टेडियमला देण्याचा निर्णय "डीडीसीए'ने घेतला. मात्र केवळ स्टेडियमचे नाव बदलले असून प्रत्यक्ष मैदान फिरोजशाहा कोटला यांच्याच नावाने ओळखले जाईल असे स्पष्टीकरण डीडीसीए'ने लगेच दिले.

नवी दिल्ली : भाजप नेते व दिल्ली क्रिकेट संघटनेचे (डीडीसीए) दीर्घकाळ अध्यक्ष असलेले दिवंगत माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे नाव फिरोजशाहा कोटला स्टेडियमला देण्याचा निर्णय "डीडीसीए'ने घेतला. मात्र केवळ स्टेडियमचे नाव बदलले असून प्रत्यक्ष मैदान फिरोजशाहा कोटला यांच्याच नावाने ओळखले जाईल असे स्पष्टीकरण डीडीसीए'ने लगेच दिले. येत्या 12 सप्टेंबरला या मैदानाचे जेटलींच्या नावे बारसे होईल. 

जेटली यांचे गेल्या शनिवारी निधन झाले. त्यांचे क्रिकेटप्रेम सर्वश्रुत होते. "डीडीसीए'चे सध्याचे अध्यक्ष रजत शर्मा हे जेटली यांचे महाविद्यालयापासूनचे जिवलग मित्र. आपल्या मित्राच्या निधनाने व्याकूळ झालेले शर्मा यांनी जेटली जगातून जाताच दोन दिवसांनी तातडीने फिरोजशाह मैदानाचे नामकरण करण्याचा ठराव आज मंजूर केला.

तथापि दिल्लीच्या इतिहासात फिरोजशाह कोटला या बादशहाच्या नावास वेगळे महत्त्व आहे. त्यामुळे हा निर्णय वादात सापडण्याची वेळ येऊ नये यासाठी "डीडीसीए'ने तातडीने एक खुलासा करून, केवळ स्टेडियमला जेटली यांचे नाव दिले जाईल व मैदान पूर्वीच्याच नावाने ओळखले जाईल असे स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stadium will be known as Feroj Shah Kotla only clears DDCA