esakal | चाहत्यांचा काही नेम नाही!! 'मेस्सी बिडी'चा फोटो व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

Lionel Messi

चाहत्यांचा काही नेम नाही!! 'मेस्सी बिडी'चा फोटो व्हायरल

sakal_logo
By
नरेश शेंडे

न्यूयॉर्क: कोपा अमेरिका फुटबॅाल स्पर्धेत (copa America Football) ब्राझिलचा (Brazil) पराभव करत तब्बल २८ वर्षांनंतर अर्जेंटिनाने (Argentina) विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. या आंतरराष्ट्रीय फुटबॅाल स्पर्धेत संघाला जेतेपद जिंकून देण्यात स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीचा (lionel Messi) सिंहाचा वाटा होता. सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळालेला मेस्सी प्रथमच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजेता ठरला. त्यामुळे मेस्सीसारखा स्टार खेळाडू चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. भारतातही त्याच्या चाहत्यांची कमी नाही. तशातच सध्या मेस्सीचा फोटो (Messi Bidi Photo)असलेल्या बीडीचा फोटो खूपच व्हायरल होताना दिसतोय. (Lionel Messi Bidi Photo viral on social media crazy Fan)

मेस्सीचे चाहते शक्य तिथे मेस्सीचा फोटो लावून आपल्या स्टार खेळाडूचे गुणगान गात असतात. तशातच काही चाहत्यांनी मेस्सीचा फोटो चक्क बीडी पॅकेटला लावला आहे. सोशल मिडियावर हा फोटो तुफान व्हायरल झाला असून आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा यांनी तो फोटो शेअर करत त्यावर प्रतिक्रिया दिली. त्या मिश्किलपणे म्हणाल्या, ''देशात मेस्सीला पहिली मान्यता मिळाली आहे." त्यावर एका नेटकऱ्याने कमेंट केली की असं वेड केवळ भारतातच पाहायला मिळेल. तर दुसऱ्याने म्हटलं की मेस्सीला याबद्दल कल्पना तरी आहे का..?

हेही वाचा: 8 कोटींच्या कारचा मालक असलेल्या शिवसैनिकावर 35 हजाराच्या वीजचोरीचा आरोप

कोपा अमेरिकेचे विजेतेपद मिळवल्यावर मेस्सी म्हणाला होता...

''कोपा अमेरिका स्पर्धेत जेतेपद मिळाल्याचा भरपूर आनंद झाला आहे. अर्जेंटिनाला विजेतेपद मिळवून दिल्याचे स्वप्न अनेकदा पाहिले आहे. यावर्षी आमचा संघ जिंकेल असा विश्वास होता. गेल्या स्पर्धेतील अपयशानंतर आमची ताकद वाढली होती. अर्जेंटिना संघातील खेळाडू कायम संघाच्या हितासाठी तयार असतात. त्यांची कसलीही तक्रार नसते'', अशा भावना मेस्सीने व्यक्त केल्या होत्या.

loading image