esakal | 8 कोटींच्या कारचा मालक असलेल्या शिवसैनिकावर 35 हजाराच्या वीजचोरीचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

8 कोटींच्या कारचा मालक असलेल्या शिवसैनिकावर 35 हजाराच्या वीजचोरीचा आरोप

8 कोटींच्या कारचा मालक असलेल्या शिवसैनिकावर 35 हजाराच्या वीजचोरीचा आरोप

sakal_logo
By
दीनानाथ परब

कल्याण: अलीकडेच कल्याणमधील (kalyan) एका उद्योजकाने आलिशान सवारीसाठी ओळखली जाणारी महागडी 'रोल्स रॉईस' कार (Rolls Royce car) विकत घेतली. या कारची किंमत ८ कोटी आहे. हा उद्योजक शिवसेनेशी (shivsena) संबंधित आहे. संजय गायकवाड (sanjay gaikwad) असे या उद्योजकाचे नाव आहे. 'रोल्स रॉईस' सारखी इतकी महागडी कार विकत घेणाऱ्या संजय गायकवाड यांच्याविरोधात ३५ हजार रुपयांच्या वीज चोरीची तक्रार नोंदवण्यात आली आहे. (Shiv Sena leader owner of Rolls Royce worth Rs 8 crore booked for Rs 35,000 power theft dmp 82)

हेही वाचा: कोरोनाच्या खडतर काळात मुंबईकरांसाठी दिलासा देणारी बातमी!

कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात संजय गायकवाड यांच्याविरोधात ही तक्रार नोंदवण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने ही तक्रार नोंदवली आहे. कल्याण पूर्वेला कोळसेवाडी येथे गायकवाड यांच्या बांधकाम साईटवर वीज चोरी सुरु असल्याची MSEDCL अधिकाऱ्यांना मार्च महिन्यात माहिती मिळाली. यानंतर MSEDCL कडून त्यांना ३४ हजार ८४० रुपयांचे बिल पाठवण्यात आले. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचा: "हे तर सुनेला पोळ्या जमत नसल्याने पीठ अंगावर ओतून घेण्यासारखं"

त्यांना १५ हजार रुपये दंड भरण्यास सांगण्यात आला. गायकवाड यांनी तीन महिन्यांचे बिल आणि दंडाची रक्कम भरली नाही, तेव्हा MSEDCL च्या अधिकाऱ्यांनी ३० जूनला पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात वीज चोरीची तक्रार नोंदवली. १२ जुलैला गायकवाड यांनी ४९,८४० रुपये बिल भरले. यात बिल आणि दंडाची रक्कम जमा आहे, असे सोमवारी रात्री MSEDCL कडून सांगण्यात आले. शिवसेनेशी संबंधित असलेल्या संजय गायकवाड यांनी MSEDCL ने आपल्यावर लावलेले आरोप चुकीच असल्याचे म्हटले असून कुठल्याही वीज चोरीशी आपला संबंध नसल्याचा दावा केला आहे.

loading image