
महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या मान्यतेने व ठाणे जिल्हा कबड्डी संघटना, विश्वास सामाजिक संस्था, ठाणे यांच्या सहकार्याने पुरुष व महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करीत आहे. ठाण्यातील कॅडबरी कंपनी समोरील जे. के. केमिकल कंपनीच्या क्रीडांगणावर १९ ते २३ मार्च २०२५ या कालावधीत ही स्पर्धा रंगेल.
राज्य अजिंक्यपद स्पर्धेच्या निमित्ताने पहिल्यांदाच ठाण्याने ‘बिबट्या’ या बोधचिन्हाचा वापर करण्यात आला आहे. अहिल्यानगर येथे झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत ‘बारशिंगे’ याचा बोधचिन्ह म्हणून वापर करण्यात आला होता.