
शेवगाव येथे सुरू असलेल्या राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी खो-खो स्पर्धेत उपांत्य फेरीत पुरुष गटामध्ये पुणे विरुद्ध सांगली, मुंबई उपनगर विरुद्ध धाराशिव तर महिला गटामध्ये धाराशिव विरुद्ध पुणे आणि सांगली विरुद्ध नाशिक असे सामने रंगणार आहेत.
पुरुषांच्या उपउपांत्य सामन्यात पुण्याने अहिल्यानगरवर एक डाव १० गुणांनी मात केली. यामध्ये विजयी संघातर्फे अथर्व देहेण (३ मि. संरक्षण), शुभम थोरात (२.३०), साहिल चिखले (१.५० मि., गुण), सिद्धार्थ पवार (१ मि., गुण) यांनी चांगला खेळ केला. अहिल्यानगरतर्फे नरेंद्र कातकडे, सारंग लबडे यांनी प्रतिकार केला.