
केज : प्रथम होणाऱ्या खो-खो विश्वकप स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करत देशाला विश्वकप मिळवून देण्याची किमया प्रियंका इंगळे च्या रूपाने या भागाच्या मातीत असल्याचा अभिमान वाटतो. त्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यास त्याच्या आवडीचे क्षेत्र निवडण्यासाठी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन रमेशराव आडसकर यांनी शुक्रवारी (ता.०७) आडस येथील भारतीय महिला खो-खो संघाची कर्णधार प्रियंका इंगळे हीच्या नागरी सत्कार सोहळ्यात बोलताना केले.