

State Swimming Championship
sakal
मालवण : राज्य जलतरण संघटनेच्या मान्यतेने व जिल्हा जलतरण संघटनेच्या वतीने चिवला बीच येथे आयोजित १५ व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत आजच्या पहिल्या दिवशी मुलांच्या गटात ठाणेच्या अश्विन कुमार, तनय लाड यांनी, तर मुलींच्या गटात नाशिकच्या अनुजा उगला, बंगळूरच्या पी. वेण्याश्री यांनी वेगवान जलतरणपटूचा बहुमान मिळविला. आजच्या पहिल्या दिवशी विविध गटांत सुमारे तीनशेहून अधिक स्पर्धक सहभागी झाले.