विराट विराट काय लावलंय, हाच हिरो मोडेल सचिनचे रेकॉर्ड

वृत्तसंस्था
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

सचिनचे विक्रम मोडण्याच्या मार्गावर स्मिथ आहे. मी सचिनविरुद्ध खेळलो आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की स्मिथ ज्या प्रकारे खेळतो आहे तो नक्कीच सचिनचे विक्रम मोडेल. 

इंग्लंड : भारताचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 42वे शतक झळकाविले. त्यानंतर कोहली लवकरच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडणार अशा चर्चा सुरु झाल्या. मात्र, कोहली नाही तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथच सचिनचे सर्व विक्रम मोडणार असा विश्वास ऑस्ट्रेलियाची माजी क्रिकेटपटू ख्रिस रॉजर्सने व्यक्त केले आहे. 

''सचिनचे विक्रम मोडण्याच्या मार्गावर स्मिथ आहे. मी सचिनविरुद्ध खेळलो आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की स्मिथ ज्या प्रकारे खेळतो आहे तो नक्कीच सचिनचे विक्रम मोडेल,'' अशा शब्दांत त्याने स्मिथचे कौतुक केले आहे. 

विराटने माझा विक्रम मोडूदे, मग बघा कसलं भारी सरप्राईज देतो त्याला

सध्या सुरु असलेल्या ऍशेस मालिकेत झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात स्मिथने 144 धावा करत ऑस्ट्रेलियाला भक्कम धावसंख्या उभारण्यात मदत केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Steve Smith Has Got Ability To Surpass Sachin Tendulkar says Chris Rogers