चाहत्यांना पटले नाही तरी लवकरच स्मिथ पुन्हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार!

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ याने नुकत्याच झालेल्या ऍशेसमध्ये तुफान कामगिरी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींग याने स्मिथ लवकरच पुन्हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. 

सिडनी : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ याने नुकत्याच झालेल्या ऍशेसमध्ये तुफान कामगिरी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींग याने स्मिथ लवकरच पुन्हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. 

INDvsSA : मी डोळे फाडून बघतच राहिलो; जगातला भारी कॅच होता तो!

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेंडू कुरतडल्या प्रकरणी त्याच्यावर एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे ऍशेसच्या रुपाने स्मिथने तब्बल एक वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केले. आणि केवळ तीन डावांमध्येच तो आयसीसी कसोटी क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकत अव्वल क्रमांक पटकाविला. 

त्याच्या याच कामगिरीमिळे तोच पुन्हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होईल असा विश्वास पाँटींगने व्यक्त केला आहे. तो म्हणाला, "स्मिथच पुन्हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होईल असे मला वाटते. चाहत्यांना तो पुन्हा कर्णधार होणे पटेल की नाही माहित नाही मात्र तोच कर्णधार व्हावा. माझ्यामते ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने त्याच्यासाठी कर्णधारपदाचे दरवाजे खुले केले असावेत. ऑस्ट्रेलिया क्रिकेटने जर त्याला कर्णधार करण्याचा निर्णय घेतला तर मला आनंदच होईल. त्याच्यावरील बंदी उठली आहे आणि आता मला नाही वाटत तो फार काळ कर्णधारपदापासून लांब राहिल.''

INDvsSA : पंतची लायकी स्थानिक क्रिकेट खेळण्याचीच

पाँटींगने यापूर्वीही स्मिथला कर्णधार करावे अशी मागणी केली होती. ऍशेसमधील पहिल्या कगसोटी सामन्यात टीम पेनला सल्ला देण्याबाबत त्याच्यावर अनेकांनी टीका केली होती. मात्र, पाँटींगने त्याचे कौतुक करत त्याच्यावर टीका करणाऱ्यांना चांगलेच सुनावले होते. 

''स्मिथने टीम पेनला सल्ला देण्याची गरज नाही. स्मिथ तू काही आता कर्णधार नाहीस, अशी एक टीका मी सोशल मीडियावर वाचली. मात्र, या चर्चा फालतू आहेत. स्मिथसारख्या अनुभवी खेळाडूचा सल्ला न घेणे हा पेनचा मूर्खपणा ठरेल. स्मिथने आपली शिक्षा भोगली आहे आणि  त्याचा अनुभवावर संघ खूप अवलंबून आहे. त्याच्या असण्यानं पेनसह संघातील प्रत्येकाला आनंदच होतो. त्याला पुन्हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार झालेलं पाहायला मला नक्कीच आवडेल. क्रिकेट ऑस्ट्रेलियालाही असेच वाटत असेल आणि म्हणूनच त्यांनी स्मिथवर आजीवन बंदी घातलेली नाही.'' अशा शब्दांत त्याने आपली भावना व्यक्त केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Steve Smith Will Captain Australia Again Says Ricky Ponting