AUS vs ENG : ब्रॉडचा विक्रम, Ashes मध्ये रचला नवा इतिहास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Stuart Broad

AUS vs ENG : ब्रॉडचा विक्रम, Ashes मध्ये रचला नवा इतिहास

Most wickets in an Ashes by England Bowler : इंग्लंडचा जलदगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने (Stuart Broad) नवा इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला बाद करताच त्याने खास विक्रम आपल्या नावे केला. इंग्लंडकडून Ashes मध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम आता त्याच्या नावे झालाय. इंग्लंडचे दिग्गज इयान बॉथम (Ian Botham) यांचा रेकॉर्ड मागे टाकत त्याने नवा विक्रम प्रस्थापित केला.

बॉथम यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत अ‍ॅशेस मालिकेत 32 सामने खेळले आहेत. यात त्यांनी 128 विकेट्स घेतल्या होत्या. ब्रॉडने हा विक्रम मागे टाकला. इंग्लंडचे बॉब बिल्स यांनी 123 विकेट घेतल्या आहेत. सध्याच्या घडीला इंग्लंडच्या (England) ताफ्यात असणाऱ्या जेम्स अँडरसनने आपल्या अ‍ॅशेस कसोटीच्या कारकिर्दीत आतापर्यंत 112 विकेट घेतल्या आहेत.

हेही वाचा: VIDEO : पॅट कमिन्सनं जाळ विणलं अन् रुट त्यात फसला!

अ‍ॅशेसमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम हा ऑस्ट्रेलियन फिरकीपटू शेन वॉर्नच्या नावे आहे. त्याने 36 कसोटी सामन्यात 195 विकेट घेतल्या आहेत. त्याच्यापाठोपाठ या यादीत ऑस्ट्रेलियन माजी जलदगती गोलंदाज ग्रेन मॅग्रा दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 157 विकेट आपल्या खात्यात जमा केल्या आहेत.

वॉर्नर ठरला झिरो

अ‍ॅशेस मालिकेतील अखेरच्या कसोटी सामन्यात डेव्हिड वॉर्नर दोन्ही डावात अपयशी ठरला. त्याला खातेही उघडता आले नाही. 2019 नंतर पहिल्यांदात एका सामन्यातील दोन डावात त्याला शून्यावर बाद होऊन तंबूचा रस्ता धरावा लागला. 2019 मध्ये ओल्ड ट्रॅफर्ड कसोटी सामन्यात एकाच डावात तो शून्यावर बाद झाला होता. स्टुअर्ट ब्रॉडने 14 व्या वेळा त्याची शिकार केली.

हेही वाचा: U19 World Cup 2022 : युवा टीम इंडिया सज्ज; सामना कधी कुठे अन् कसा पाहायचा?

दुसऱ्या दिवशीच्या खेळात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पहिला डाव 188 धावांत संपुष्टात आला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाची सुरुवातही खराब झाली. डेव्हिड वॉर्नरसह, मागील सामन्यातील शतकवीर उस्मान ख्वाजा 11 (38) आणि मार्नस लाबुशेन 5 (11) स्वस्तात माघारी फिरले आहेत. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी ऑस्ट्रेलियने 3 बाद 37 धावा केल्या होत्या. त्यांनी सामन्यात 152 धावांची आघाडी घेतली होती. स्टीव्ह स्मिथ 17 (37) आणि स्कॉट 3 (25) धावांवर खेळत होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top