
Sunil Chhetri
sakal
नवी दिल्ली : भारताचा अनुभवी खेळाडू सुनील छेत्री याचा राष्ट्रीय सराव शिबिरात समावेश करण्यात आला आहे. त्याच्यासह राहुल भेके व रोशन सिंग नाओरेम यांनाही निवडण्यात आले आहे. एएफसी आशियाई करंडक पात्रता फेरीतील लढतीसाठी भारतीय फुटबॉल संघाचे शिबिर बंगळूर येथे सुरू आहे. आता या तीन खेळाडूंच्या समावेशामुळे या शिबिरात २८ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.