Sunil Chhetri : एक पर्व संपलं! सुनिल छेत्रीच्या डोळ्यात तरळले अश्रू; सामना राहिला 0-0 बरोबरीत

Sunil Chhetri Retirement : कारकिर्दिच्या शेवटच्या सामन्यात सुनिल छेत्रीला गोल करण्यात आपयश आलं.
Sunil Chhetri
Sunil Chhetri Retirement esakal

Sunil Chhetri Last Match India Vs Kuwait : वर्ल्डकप पात्रता फेरीतील भारत आणि कुवेत सामना पूर्णवेळ गोल शुन्य बरोबरीत राहिला. हा सामना भारताचा कर्णधार सुनिल छेत्रीचा कारकिर्दीतील शेवटचा सामना होता. मात्र या सामन्यात सुनिल छेत्रीला गोल करण्यात अपयश आलं. सामना झाल्यानंतर प्रेक्षकांनी छेत्रीच्या नावाचा जयघोष सुरू केला. भारताचा कर्णधार चाहत्यांच प्रेम पाहून थोडा भावनिक देखील झाला.

Sunil Chhetri
Hardik Pandya : साठीतल्या हार्दिकपेक्षा... पांड्यानं सांगितलं नकारात्मक वातावरण कसं फिरवलं

सुनिल छेत्रीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली. आज कोलकाता येथे फिफा वर्ल्डकप 2026 च्या पात्रता फेरीतील भारत विरूद्ध कुवेत सामना खेळवला गेला. हा कर्णधाराचा शेवटचा सामना होता. छेत्री हा आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे.

आजच्या सामन्यात भारतीय संघ आणि कुवेतला देखील गोल करण्याचा अनेक संधी मिळाल्या. मात्र त्यांना या संधीचं गोलमध्ये रूपांतर करता आलं नाही. भारतीय संघ सध्या ग्रुपमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. आता त्यांना पुढच्या फेरीत जाण्यासाठी कतारविरूद्धचा पुढचा सामना जिंकावा लागणार आहे.

Sunil Chhetri
IND vs PAK : आमचं हॉटेल बदलून द्या! पीसीबीनं भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वी आयसीसीला भरला दम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com