
शिलाँग, ता. १८ : भारतीय फुटबॉल संघाचा महान फुटबॉलपटू सुनील छेत्री आज पुनरागमन करणार आहे. भारत-मालदीव यांच्यामध्ये शिलाँग येथे आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण लढत रंगणार असून, या लढतीत सर्वांचे लक्ष सुनील छेत्रीच्या खेळाकडे असणार आहे.
भारत-बांगलादेश यांच्यामध्ये एएफसी आशियाई करंडक पात्रता फेरीची लढत २५ मार्चला पार पडणार आहे. त्याआधी मालदीवविरुद्धची लढत रंगीत तालीम म्हणून बघितली जात आहे. मनोलो मारकेझ यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय फुटबॉल संघ मैदानात उतरणार आहे.