कोहली आता तरी पंतचा नाद सोड; गावसकरांचा सल्ला

वृत्तसंस्था
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

भारतीय क्रिकेट संघाच्या चौथ्या क्रमांकाचा प्रश्‍न सुटला आहे. रिषभ पंतपेक्षा या क्रमांकासाठी श्रेयस अय्यरच योग्य निवड असून, संघ व्यवस्थापनाने त्याला मधल्या फळीसाटी कायमस्वरुपी स्थान द्यायला हवे, असे मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी व्यक्त केले आहे. 

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाच्या चौथ्या क्रमांकाचा प्रश्‍न सुटला आहे. रिषभ पंतपेक्षा या क्रमांकासाठी श्रेयस अय्यरच योग्य निवड असून, संघ व्यवस्थापनाने त्याला मधल्या फळीसाटी कायमस्वरुपी स्थान द्यायला हवे, असे मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी व्यक्त केले आहे. 

एक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर भारतीय संघात पुनरागमन केल्यानंतर श्रेयसने रविवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात उपयुक्त अर्धशतकी खेळी केली. भारतीय संघ व्यवस्थापन या क्रमांकासाठी सातत्याने रिषभ पंतला पाठिंबा देत आहे. गावसकर म्हणाले,"पंतची जागा ही धोनीप्रमाणे पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकाची आहे. त्याच्याकडे सामना संपविण्याची क्षमता आहे. त्याचा नैसर्गिक खेळ असाच आक्रमक शैलीचा आहे. चौथ्या क्रमांकावर आक्रमणाला संयमाची जोड आवश्‍यक असते आणि ती उणीव श्रेयस अय्यर भरून काढू शकतो.'' 

श्रेयसने ही संधी साधली नसती,तर भारताच्या चौथ्या क्रमांकाचा प्रश्‍न या वेळी देखील सुटला नसता. आता तरी त्याला एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाची प्रदिर्घ सेवा करण्याची संधी मिळावी. 
-सुनील गावसकर, माजी कर्णधार

श्रेयस आणि पंतच्या क्रमांकाबाबत अधिक विश्‍लेषण करताना गावसकर म्हणाले,"भारताला शिखर धवन, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याकडून चांगली सुरवात मिळाली, तर पंतचा चौथ्या क्रमांकाचा पर्याय उपयुक्त ठरु शकतो. पण, जेव्हा 30 ते 35 षटके खेळण्याचा प्रश्‍न येईल, त्यावेळी श्रेयस अय्यरच चौथ्या क्रमांकासाठी योग्य आहे. मग, पंत पाचव्या क्रमांकावर खेळेल.'' 

विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अशाच अडचणीच्या प्रसंगी श्रेयस अय्यरने कर्णधार कोहलीला दिलेली साथ मोलची ठरली. त्याने आपली उपयुक्तता सिद्ध केली. गावसकर म्हणाले,""त्याने संधीचे सोने केले. पाचव्या क्रमांकावर खेळायला येऊनही त्याला खेळण्यासाठी पुरेशी षटके मिळाली. त्याला जोडीदारही कर्णधार होता. कर्णधार जबाबदारी घेण्यास आणि तुमच्यावरील दडपण कमी करण्याची क्षमता राखून होता. अय्यरने खूप योग्य प्रकारे परिस्थिती हाताळली.'' 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunil Gavaskar backs Shreyas Iyer at numer 4 in Indian Cricket Team