Prithvi Shaw: 'तुला जर निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घ्यायचे असेल तर...'; गावसकरांनी शॉ दिला सल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sunil Gavaskar huge selection committee remark after Prithvi Shaw

Prithvi Shaw: 'तुला जर निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घ्यायचे असेल तर...'; गावसकरांनी शॉ दिला सल्ला

Sunil Gavaskar Prithvi Shaw : भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉ देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करत आहे. अलीकडेच त्याने रणजी ट्रॉफीमध्ये आसामविरुद्ध 379 धावांची मॅरेथॉन इनिंग खेळून पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शॉने आसामविरुद्धच्या या खेळीत 49 चौकारांसह 4 गगनचुंबी षटकारही ठोकले. भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनीही पृथ्वीच्या खेळीचे कौतुक केले आहे.

हेही वाचा: IND vs SL: अक्षर पटेलने 'या' खेळाडूची कारकीर्द सुरु होण्याआधी संपवले?

भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील कॉमेंट्री दरम्यान शॉच्या या खेळीबद्दल बोलताना माजी भारतीय कर्णधार म्हणाला की प्रत्येकजण 60-70 धावा करतो, जर तुम्हाला निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घ्यायचे असेल तर तुम्हाला एवढी मोठी खेळी खेळावी लागेल.

खरं तर, निवडकर्त्यांचे लक्ष वेधण्यासाठी तुम्हाला मोठी शतके, दुहेरी किंवा तिहेरी शतके झळकावी लागतात. त्याने जवळपास 400 धावांची इनिंग खेळली. त्याने 400 हून अधिक धावांची इनिंग खेळली असती तर खूप छान झाले असते.

हेही वाचा: IND vs SL: कुलदीप यादव शेवटच्या ODI सामन्यातून बाहेर! 'या' कारणावरून पडला प्रश्न

पुढे बोलताना गावसकर म्हणाले की, 379 धावांची ही खेळी खेळूनही पृथ्वी शॉ थोडा निराश होईल, खरे तर तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये भारतीयाकडून सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ होता. बाबासाहेब निंबाळकर यांच्या नावावर हा विक्रम आहे. 1948 मध्ये महाराष्ट्राकडून खेळताना त्याने काठियावाडविरुद्ध 433 धावांची नाबाद खेळी केली होती.