'विराट-रोहितमध्ये वाद कोण लावतय मला माहिती'

वृत्तसंस्था
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

"ड्रेसिंगरुमधील काही खेळाडू ज्यांनी संधी मिळत नसते यातील जे सैरभैर होतात तसे खेळाडू ड्रेसिंगरुमधील वातावरण अशा प्रकारे बिघडवत असतात. अशा प्रकारच्या अफवाना हवा देत असतात त्यामुळे ज्याने विराट-रोहित संदर्भात कहाण्या पिकवल्या आहेत ते भारतीय संघाचे निश्‍चितच हितचिंतक नाही.

विराट-रोहित यांच्यातील वादाच्या कहाण्यांचा उमग कोठून झाला यावर गावसकर यांनी मतप्रदर्शन केले आहे. ते म्हणतात, "ड्रेसिंगरुमधील काही खेळाडू ज्यांनी संधी मिळत नसते यातील जे सैरभैर होतात तसे खेळाडू ड्रेसिंगरुमधील वातावरण अशा प्रकारे बिघडवत असतात. अशा प्रकारच्या अफवाना हवा देत असतात त्यामुळे ज्याने विराट-रोहित संदर्भात कहाण्या पिकवल्या आहेत ते भारतीय संघाचे निश्‍चितच हितचिंतक नाही. अशांची "जलस' वृत्ती संघासाठी घातक असते त्यानंतर असे वातावरणात काही प्रशासक आपले राजकारण खेळण्यास सरसावलेले असतातच.'' 

गावसकर यांनी प्रसिद्धी माध्यमांनाही धारेवर धरले आहे. अशा कहाण्या म्हणजे प्रसिद्धी माध्यांना क्रिकेट खेळापेक्षा प्राधान्याच्या असतात. ज्या दिवशी सामने नसतात त्या दिवशी अशा बातम्या चवीने दिल्या जातात, विराट आणि रोहित हे व्यावसाईक खेळाडू आहेत देशाला जिंकून देण्यासाठी सर्वस्व देत आहे. पण खेळाडूंमधील वादाच्या बातम्या 20 वर्षांनंतरही अशाच प्रकारे प्रसिद्ध होत रहातील अशी खंत गावसकर यांनी व्यक्त केली. 

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यावर संघात दुफळी निर्माण झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या होत्या. आता वेस्ट इंडीज दौऱ्यावर प्रयाण करण्यापूर्वी विराटने सर्व अफवांवर खुलासा केला होता. संघात दुफळी असती तर आम्ही एवढी प्रगती केली नसते असे तो म्हणाला होता.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunil Gavaskar knows who started the news of Rohit Sharma and Virat Kohli fight