रहाणे, पुजाराचे भवितव्य गोलंदजांच्या हातात? | Sunil Gavaskar Statement on Ajinkya Rahane and Cheteshwar Pujara Test Career | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajinkya Rahane and Cheteshwar Pujara Test Career
रहाणे, पुजाराचे भवितव्य गोलंदजांच्या हातात?

रहाणे, पुजाराचे भवितव्य गोलंदजांच्या हातात?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीत भारताचा पहिला डाव २०२ धावात संपुष्टात आला. भारताकडून केएल राहुल (५०) आणि आर. अश्विन (४६) यांनी थोडाफार प्रतिकार केला. मात्र अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) या दोन अनुभवी फलंदाजांना विराटच्या अनुपस्थितीत भारताची फलंदाजी सावरता आली नाही. अजिंक्य रहाणे भोपळाही न फोडता माघारी परतला. तर चेतेश्वर पुजाराने ३३ चेंडूत ३ धावांची खेळी करुन पॅव्हेलियनची वाट धरली. (Sunil Gavaskar Statement on Ajinkya Rahane and Cheteshwar Pujara Test Career)

हेही वाचा: मोहम्मद हाफीज निवृत्तीनंतर लगेच वाकड्यात शिरला

बराच काळ झाला अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara Test Careers) या दोघांच्याही बॅटमधून धावांची बरसात झालेली नाही. त्यामुळे हे दोन्ही फलंदाज रडावर आहेत. अजिंक्य रहाणेला (Cheteshwar Pujara Test Careers) तर खराब फॉर्ममुळे कसोटी संघाचे उपकर्णधारपदही गमवावे लागले होते. हा रहाणेसाठी इशारा होता. चेतेश्वर पुजारासाठीही दक्षिण आफ्रिका दौरा ही शेवटची संधी असेल असे बोलले जात होते. दरम्यान, भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी या दोघांबद्दल मोठे वक्तव्य केले. त्यांच्या विधानाचा रोख हा रहाणे, पुजाराला आता आपली कसोटी कारकिर्द वाचवण्यासाठी एकच डाव मिळणार याच्याकडे होता.त्यामुळे भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव लवकर संपवला तर भारताला दुसरा डाव खेळण्याची संधी मिळेल आणि ही अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्यासाठी शेटवची संधी असेल.

हेही वाचा: पोरीनं नाद केला, पण वाया नाही गेला!

सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar)म्हणाले की, 'हे दोघे बाद झाल्यानंतर सर्वांनाच माहिती आहे की रहाणे आणि पुजाराकडे आपली कसोटी कारकिर्द (Rahane Pujara Test Careers) वाचवण्यासाठी आता फक्त एक डाव शिल्लक आहे.' ते पुढे म्हणाला की, 'या दोघांच्या संघातील स्थानाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. ते ज्या प्रकारे दुसऱ्या कसोटीत बाद झाले ते पाहता त्यांच्याकडे फक्त एक डाव शिल्लक आहे. जर सामन्यात दुसरा डाव झाला, भारत ज्या प्रकारे खेळत आहे ते पाहता दुसरा डाव होईल. या दोघांना धावा करुन आपली कसोटी कारकिर्द वाचवण्यासाठी हा एकच डाव उरला आहे.'

हेही वाचा: BBL : बीग बॅश लीगने स्वतःचे आयपीएल होऊ दिले नाही

चेतेश्वर पुजाराने २०१९ पासून एकही शतक झळकावलेले नाही. याचबरोबर काही वर्षे झाली अजिंक्य रहाणेलाही आपल्या खेळात सातत्य राखता आलेले नाही. दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत (South Africa vs India 2nd Test) विराट कोहली दुखापतीमुळे खेळू शकला नाही. त्याच्या जागी हनुमा विहारीला संधी मिळाली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top