विराट - रोहितला एकटं सोडा रे : गावसकर

Sunil Gavaskar Statement About Virat Kohli Rohit Sharma Rift
Sunil Gavaskar Statement About Virat Kohli Rohit Sharma Rift esakal

भारताने पहिल्या वनडे सामन्यात वेस्ट इंडीजचा (India vs West Indies) सहज पराभव केला. अनेक दिवसांनी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) दोघेही मैदानावर एकत्र दिसले होते. रोहितने आपल्या पूर्णवेळ कर्णधारपदाची सुरूवात विजयाने केली. या सामन्यादरम्यान, भारताचा माजी कर्णधार विराट कोहली हा रोहित शर्माला अनेक वेळा सल्ला देताना, गोलंदाजांना सल्ला देताना दिसला. विराट काही वेळी डीआरएस घेण्याबाबत आग्रही देखील होता. त्यानंतर (Sunil Gavaskar Statement About Virat Kohli Rohit Sharma Rift)

Sunil Gavaskar Statement About Virat Kohli Rohit Sharma Rift
IPL 2022: विराटने आरसीबी का सोडली नाही?

दरम्यान, सामना झाल्यानंतर एका कार्यक्रमात भारताचे दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांना विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील कथित वादाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी ही निरर्थक गोष्ट आहे. हे सगळे अंदाज आहेत यातलं काही खरं नाही असं म्हणत हा दावा खोडून काढला.

ते म्हणाले की, 'त्यांना आपण एकटं का सोडत नाही? ते भारतासाठी खेळतात. या दोन खेळाडूंमध्ये काहीतरी बिनसलंय असं बोललं जातं. मात्र ही बातमी देताना ती शक्यता, विश्वसनीय सूत्रांकडून, असा आरोप होतोय, मिळालेल्या माहितीनुसारच देण्यात येते.'

Sunil Gavaskar Statement About Virat Kohli Rohit Sharma Rift
फ्लॉवरने PSL ऐवजी IPL 2022 Auctionला दिले महत्व; घेतला ब्रेक

सुनिल गावसकर पुढे म्हणाला की, 'हे अनेक वर्षापासून होत आहे. हे पहिल्यांदाच होत आहे असं नाही. ज्या व्यक्तींबाबत असं बोललं जात आहे त्यांना याचा काहीही फरक पडत नाही. त्यांना या वावड्यांच काहीच वाटत नाही कारण त्यांना सत्य माहिती असतं. संघातील माजी कर्णधार चांगली कामगिरी करत नाही कारण त्याला नवा कर्णधार (New Captain) यशस्वी व्हावा असे वाटत नाही. असं म्हणण्याला काही अर्थ नाही. जर त्याने धावा केल्या नाहीत किंवा विकेट घेतल्या नाहीत तर तो संघाच्या बाहेर फेकला जाईल. त्यामुळे जे काही बोललं जात आहे ते फक्त शक्यतांवर बोललं जात आहे. लोकांना काल्पनिक गोष्टी तयार करण्याशिवाय दुसरे काही काम नाही.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com