Sunil Narayan : दरवाजे कायमचे बंद, पुनरागमन नाही; विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्याबाबत नारायणचे स्पष्ट मत

दरवाजे कायमचे बंद झाले आहेत, आंतरराष्ट्रीय पुनरागमनाचा कोणताही विचार करणार नाही, अशा शब्दात आयपीएलमध्ये अष्टपैलू कामगिरी करत असलेल्या वेस्ट इंडीजच्या सुनील नारायणने स्पष्ट नकार दिला.
Sunil Narayan
Sunil NarayanSakal

कोलकता : दरवाजे कायमचे बंद झाले आहेत, आंतरराष्ट्रीय पुनरागमनाचा कोणताही विचार करणार नाही, अशा शब्दात आयपीएलमध्ये अष्टपैलू कामगिरी करत असलेल्या वेस्ट इंडीजच्या सुनील नारायणने स्पष्ट नकार दिला.

फिरकी गोलंदाजीची आगळीवेगळी शैली असलेला ३५ वर्षीय सुनील नारायण ऑगस्ट २०१९ मध्ये वेस्ट इंडीजकडून आपला अखेरचा ट्वेन्टी-२० सामना खेळलेला आहे. त्यानंतर जगभरातील ट्वेन्टी-२० व्यायसायिक लीगमध्ये खेळता यावे, यासाठी गेल्या नोव्हेंबरमध्ये त्याने अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुडबाय केलेले आहे.

आयपीएलमध्ये कोलकता संघातून खेळत असताना तो गोलंदाजीतच नव्हे तर सलामीला येऊन फलंदाजीतही तेवढीच प्रभावी कामगिरी करत आहे. एक शतकही त्याने झळकावलेले आहे. त्यामुळे जून महिन्यात वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत नारायणने खेळावे, यासाठी वेस्ट इंडीजच्या कर्णधारापासून काही जण प्रयत्न करत आहेत.

आयपीएलमधील माझी कामगिरी पाहून अनेक जण मला निवृत्ती मागे घेण्यासाठी विनंती करत आहे. त्यांचे मी मनापासून आभार मानतो; परंतु निवृत्तीचा निर्णय कधीच घेतलेला आहे आणि त्यात बदल होणार नाही. माझ्यासाठी पुनरागमनाचे दरवाजे मी स्वतःच बंद केले आहे; मात्र मायदेशात होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी मी संघाला सपोर्ट करण्यासाठी तेथे उपस्थित असेन, अशी भावना नारायणने व्यक्त केली आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये भरीव कामगिरी करत असलेले वेस्ट इंडीज संघातील खेळाडू संघात स्थान मिळवण्याचे हक्कदार आहेत आणि ते पुन्हा संघाला आणखी एक विजेतेपद मिळवून देऊ शकतील, त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देत आहे, असे नारायणने इन्स्टाग्रामवरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आयपीएलमध्ये २०१२ पासून कोलकता संघातून खेळणारा नारायण त्यांचा हुकमी खेळाडू आहे. मुळात तो फिरकी गोलंदाज आहे; परंतु फलंदाजीतही तेवढीत चमकदार कामगिरी करत आहे. यंदा आत्तापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सातव्या स्थानावर आहे.

गेल्या आठवड्यात राजस्थानविरुद्ध शतकी खेळी करणाऱ्या नारायणने आत्तापर्यंत २८६ धावा फटकावलेल्या आहेत. गोलंदाजीत त्याने २२.११ च्या सरासरीने नऊ विकेट मिळवलेल्या आहेत. नारायणने या विश्वकरंडक स्पर्धेत खेळावे,

यासाठी त्यांची कर्णधार रोमवान पॉवेल कमालीचा प्रयत्नशील आहे. कायरन पोलार्ड, द्वेन ब्रावो आणि निकोलस पूरन यांनाही नारायणशी बोलण्यासाठी गळ घातली होती. गेल्या १२ महिन्यापासून आम्ही प्रयत्न करतोय; परंतु नारायणने सर्वांना ब्लॉक केलेले आहे, असे पॉवेल काही दिवसांपूर्वीच म्हणाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com