सनी इलेव्हनचा तीन गडी राखून विजय 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

पुणे जिल्हा क्रिकेट संघटना (पीडीसीए) आयोजित वासंतिक साखळी क्रिकेट स्पर्धेत संजय दळवीने केलेल्या सुरेख खेळाच्या जोरावर सनी इलेव्हनने जय शिवराय क्रिकेट क्‍लबचा तीन गडी राखून पराभव केला. 

पुणे : पुणे जिल्हा क्रिकेट संघटना (पीडीसीए) आयोजित वासंतिक साखळी क्रिकेट स्पर्धेत संजय दळवीने केलेल्या सुरेख खेळाच्या जोरावर सनी इलेव्हनने जय शिवराय क्रिकेट क्‍लबचा तीन गडी राखून पराभव केला. 

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना जय शिवराय क्रिकेट क्‍लबने 5.90 च्या सरासरीने सात बाद 118 धावा केल्या त्यात महत्वाचा वाटा जयेश तांबे (नाबाद 46) व सौरभ दोडकेने केलेल्या (40), सुरेख फलंदाजीचा होता. तर सनी इलेव्हनने 6.37 च्या सरासरीने आठ चेंडू बाकी असतानाच सात बाद 119 धावा करून विजय मिळविला. त्यात प्रमुख वाटा संजय दळवीने 28 चेंडूतच केलेल्या नाबाद 45 धावांचा होता. निखील दाभाडेने तीन गडी बाद केले. या स्पर्धेतील "सामन्याचा मानकरी' हा मान सनी इलेव्हनच्या संजय दळवीने मिळविला. 

संक्षिप्त धावफलक : 
जय शिवराय क्रिकेट क्‍लब - (20 षटकांत) 7 बाद 118 (जयेश तांबे नाबाद 46, सौरभ दोडके 40, मालोजी निगडे 2-6, संजय दळवी 2-13, अजिंक्‍य गायकवाड 1-7, अमर खेडेकर 1-20, जयंत भोसले 1-29) पराभूत विरुद्ध सनी इलेव्हन - (18.4 षटकांत) 7 बाद 119 (संजय दळवी नाबाद 45, प्रसन्ना मोरे 21, निखिल दाभाडे 3-28, सौरभ दोडके 2-15, लालाराम प्रजापती 2-25) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunny Eleven wins by 3 wickets