हार्दिक, राहुलचे भविष्य सर्वोच्च न्यायालयाच्या हातात

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 जानेवारी 2019

भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि सलामीवीर लोकेश राहुल यांचा क्रिकेटमधील भविष्याबाबतचा निर्णय आता सर्वोच्च न्यायालयाच्या हातात आहे. येत्या पाच फेब्रुवारीला त्या दोघांवरही सुनावणी होणार आहे.

नवी दिल्ली : भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि सलामीवीर लोकेश राहुल यांचा क्रिकेटमधील भविष्याबाबतचा निर्णय आता सर्वोच्च न्यायालयाच्या हातात आहे. येत्या पाच फेब्रुवारीला त्या दोघांवरही सुनावणी होणार आहे. त्यामुळे गेल्या काही आठवड्यांपासून सुरु असलेल्या वादावर पडदा पडण्याची शक्यता निमार्ण झाली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने कॉफी विथ करण या कार्यक्रमात झालेल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तपास समितीची स्थापना केली. त्यामुळे हार्दिक आणि राहुल यांच्या कराराच्या श्रेणीवर गदा येण्याची शक्यता आहे. 

अखेर सर्वोच्च न्यायलयाने त्यांच्या सुनावणीची तारिख जाहीर केली आहे. त्यांच्यावरील सुनावणी पाच फेब्रुवारीला केली जाणार असल्याने आणखी काही दिवस त्यांना क्रिकेटपासून लांब राहावे लागणार आहे. तसेच त्यांच्यावरील कारवाई लांबल्यास दोघांनाही मार्च महिन्यात सुरु होणाऱ्या आयपीएल आणि जून महिन्यात होणाऱ्या विश्वकरंडकासही मुकावे लागण्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supreme court To hear KL Rahul and Hardik Pandya case on February 5th