Suresh Raina| 'मिस्टर IPL' पुन्हा CSK च्या ताफ्यात दाखल? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suresh Raina

'मिस्टर IPL' पुन्हा CSK च्या ताफ्यात दाखल?

टीम इंडियाचा माजी क्रिकेटर सुरेश रैना पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात दाखल झाला आहे. अशी चर्चा क्रिकेट जगतात सुरू आहे. सुरेश रैना सीएसकेच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

मिस्टर आयपीएल म्हणून ओळखला जाणाऱ्या सुरेश रैनाला चेन्नईच्या वेल्स विद्यापीठाने डॉक्टरेट देऊन सन्मानित केले आहे. त्यानंतर सुरेश रैनावर शुभेच्छांचा वर्षावर होऊ लागला अशातच सीएसकेनेदेखील रैनाचा उल्लेख 'डॉ. 'आयपीएल' असा केला. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सुरेश रैना सीएसकेच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला आहे. तिथे तो काही अधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना दिसत आहे. तसेच, संघातील काही खेळाडू म्हणजे वेगवान गोलंदाज दीपक चाहरसोबत दिलखुलास गप्पा मारताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना 'Dr. IPL's special Check-IN' अशी कॅप्शन देण्यात आली आहे. त्यामुळे क्रिकेट जगतात रैना पुन्हा सीएसकेच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

सुरेश रैनाला वेल्स इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड एडवान्स्ड स्टीजकडून डॉक्टरेटची पदवी देण्यात आली आहे. रैनाने ट्विटरवर या सोहळ्याचे फोटो पोस्ट करत लाहिले, मी वेल्स इन्स्टिट्यूट ऑफ साइंड अँड टेक्नॉलॉजी अँड अॅडव्हान्स स्टडीजकडून हा सन्मान मिळाल्याबद्दल खूप खुश आणि आभारी आहे. मला सर्वांकडून मिळत असलेल्या प्रेमाने खूप भावूक झालो आणि सर्वांचे मनापासून आभार मानतो. चेन्नई हे माझे घर आहे आणि ही जागा माझ्यासाठी खास राहिली आहे. अशी भावना व्यक्त केली आहे.

Web Title: Suresh Raina May Comeback In Csk

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CricketSuresh Raina