सुरेश रैनाने घेतली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट | Suresh Raina Meet Uttar Pradesh CM Yogi Aditayanath | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suresh Raina Meet Uttar Pradesh CM Yogi Aditayanath

सुरेश रैनाने घेतली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट

लखनौ : भारताचा माजी फलंदाज सुरेश रैना (Suresh Raina) सध्या आयपीएलमध्ये (IPL 2022) समालोचन करण्यात व्यग्र होता. मात्र त्याने त्यातूनही वेळ काढत कुटुंबियांसोबत सुट्टी एन्जॉय केली. आता सुरेश रैनाचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh CM Yogi Aditayanath) यांची भेट घेतल्याचे फोटो समोर आले आहे. या फोटोंनंतर सुरेश रैना राजकीय खेळी खेळण्याच्या तयारीत तर नाही ना असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडणे स्वाभाविक आहे. मात्र याचे उत्तर खुद्द सुरेश रैनाने दिले.

हेही वाचा: अझहरूद्दीनचा MI ला सल्ला; प्लेईंग इलेव्हनमध्ये तेंडुलकर नाव जोडा, नशीब बदला

सुरेश रैनाने योगी आदित्यनाथ यांच्यासोबतच्या भेटीचे फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करून सुरेश रैना म्हणतो की, 'आज माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजीं शी शिष्टाचार भेट झाली. त्यांचे खेळ आणि युवकांबद्दलचे, तसेच राज्याच्या विकासाबाबतचे विचार ऐकून खूप छान वाटले. परमेश्वराकडे तुमच्या उत्तम स्वास्थाची प्रार्थना करतो. राज्याला तुमचे अभुतपूर्व मार्गदर्शन अशाच प्रकारे मिळत राहो.'

हेही वाचा: दिनेश कार्तिकच्या वयाकडे पाहू नका : सुनिल गावसकर

सुरेश रैना गेल्या काही दिसांपूर्वी झालेल्या आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिल्याने चर्चेत आला होता. त्याला त्याची फ्रेंचायजी चैन्नई सुपर किंग्जने देखील विकत घेण्यात रस दाखवला नाही. दरम्यान, त्याने समालोचक म्हणून आपले नवी कारकिर्द देखील सुरू केली होती. मात्र आता त्यातून त्याने थोड्या काळासाठी ब्रेक घेतला असल्याचेही बोलले जात आहे. तो आपल्या कुटुंबियांसोबत सुट्टीसाठी नेदरलँडला गेला होता.

Web Title: Suresh Raina Meet Uttar Pradesh Cm Yogi Aditayanath Photo Gone Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..