दिनेश कार्तिकच्या वयाकडे पाहू नका : सुनिल गावसकर

Sunil Gavaskar Statement About Dinesh Karthik
Sunil Gavaskar Statement About Dinesh Karthik esakal

मुंबई : रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा नवा मॅच फिनिशर दिनेश कार्तिक (Dinsh Karthik) सध्या त्याच्या खेळीने आणि भारतीय संघात संभाव्य पुनरागमनाने चर्चेत असतो. दिनेश कार्तिकला भारताच्या टी 20 वर्ल्डकप संघात स्थान देण्यात यावे अशी मागणी अनेक जणांकडून होत आहे. 36 वर्षाच्या दिनेश कार्तिकमध्ये अजून बरेच क्रिकेट बाकी आहे. तो आयपीएलमध्ये फिनिशर (Match Finisher) म्हणून धडाकेबाज कामगिरी करत आहे. त्याचा फिटनेस देखील चांगला आहे. कार्तिकने देखील टी 20 संघात स्थान मिळावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान, भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी देखील दिनेश कार्तिकला भारतीय संघात स्थान देण्याच्या मागणीबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.

Sunil Gavaskar Statement About Dinesh Karthik
शोएब अख्तर म्हणतो, मी 163 किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी केलीय

यंदाच्या हंगामात दिनेश कार्तिक रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) फिनिशर म्हणून दमदार कामगिरी करत आहे. आतापर्यंत प्रतिस्पर्धी संघांना फक्त एकदाच दिनेश कार्तिकला बाद करणे जमले आहे. त्याने 209.57 च्या स्ट्राईक रेटने 32, 14, 44, 7, 34, 66 अशा धावा केल्या आहेत. तो सहा पैकी पाच डावात नाबाद राहिला आहे. दरम्यान, सुनिल गावसकर यांनी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले की, 'दिनेशने भारताच्या टी 20 वर्ल्डकप संघात स्थान मिळावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. मला असे म्हणायचं आहे की त्याच्या वयाकडे पाहू नका. तो कशा प्रकारे कामगिरी करत आहे हे पाहा'

गावसकर पुढे म्हणाले की, 'त्याने खेळाकडे पाहण्याचा दृष्टीकोणच बदलून टाकला आहे. तो त्याच्या संघासाठी दमदार कामगिरी करत आहे. टी 20 वर्ल्डकपमध्ये सहा आणि सात क्रमांकाच्या फलंदाजाकडून जशा कामगिरीची अपेक्षा असते त्या पद्धतीची कामगिरी तो सध्या करत आहे.'

Sunil Gavaskar Statement About Dinesh Karthik
"महिला क्रिकेटर्सना पुरुष खेळाडूंची वापरलेली जर्सी दिली जायची"

दिनेश कार्तिकची 34 चेंडूत 66 धावांची खेळी यंदाच्या आयपीएल हंगामातील त्याची सर्वोत्तम खेळी आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध ही खेळी केली. विशेष म्हणजे अनुभवी मुस्तफिजूर रेहमान आणि खलील अहमद यांच्या कसलेल्या गोलंदाजीसमोर काही भन्नाट फटके मारले होते. त्यामुळे आरसीबीने दिल्ली विरूद्ध 189 धावा उभारल्या. आरसीबीने हा सामना 16 धावांनी जिंकला. दिनेश कार्तिकला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता. दिनेश कार्तिकने भारताकडून 26 कसोटी, 94 वनडे आणि 32 टी 20 सामने खेळले आहेत. 36 वर्षाचा हा विकेटकिपर बॅट्समन भारताकडून शेवटचा 2019 च्या वर्ल्डकपमध्ये खेळला होता. त्यात भारत न्यूझीलंडकडून सेमी फायनलमध्ये पराभूत झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com