esakal | निलंबित इंग्लिश क्रिकेटरसाठी पंतप्रधानांचा '​स्ट्रेट ड्राइव्ह'
sakal

बोलून बातमी शोधा

Robinsons  And Boris Johnson

निलंबित इंग्लिश क्रिकेटरसाठी पंतप्रधानांचा '​स्ट्रेट ड्राइव्ह'

sakal_logo
By
सुशांत जाधव

UK PM Boris Johnson on Robinsons Suspension : इंग्लंड क्रिकेटमध्ये वर्णभेदाचा मुद्दा चांगलाच चर्चेचा विषय ठरताना दिसतोय. सात-आठ वर्षांपूर्वी केलेल्या वादग्रस्त ट्विटमुळे इंग्लंडच्या क्रिकेटरचे आंतरराष्ट्रीय करियर पदार्पणाच्या कसोटी सामन्यात पाच दिवसांतच धोक्यात आले. ईसीबीने ओली रॉबिन्सनला बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर ब्रिटनच्या क्रीडा मंत्र्यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनीही या प्रकरणावर भाष्य केले आहे. (Sports Ministers Objection To Robinsons Suspension Supports UK-PM)

वर्णभेदी आणि लिंगभेदी ट्विटवरुन न्यूझीलंड विरुद्ध पदार्पण करणाऱ्या ओली रॉबिन्सन याला निलंबित करण्याचा निर्णय इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने घेतलाय. या प्रकरणावर ब्रिटनटचे क्रीडा मंत्री ओलिव्हर डाउडेन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रॉबिन्स याच्यासंदर्भातील प्रकरणात इंग्लंड आणि वेल्स बोर्डाने अधिकच कठोर निर्णय घेतलाय, असे क्रीडा मंत्र्यांनी म्हटले होते. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी क्रीडा मंत्र्यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.

हेही वाचा: माफीनाम्यानंतरही क्रिकेट करियरला ब्रेक! नेमकं काय आहे प्रकरण

क्रीडा मंत्र्यांनी ट्विटच्या माध्यमातू भूमिका मांडताना म्हटलंय की, रॉबिन्सन याने केलेली वादग्रस्त ट्विट हे अपरिपक्व असताना (लहान असताना) केले होते. सध्याच्या घडीला तो परिपक्व झालाय. त्यामुळे ईसीबीने आपल्या निर्णयावर पुन्हा विचार करावा, असा सल्ला क्रीडा मंत्र्यांनी ईसीबीला दिला आहे.

हेही वाचा: ENGvsNZ: दमदार पदार्पणानंतर गोलंदाजाला जुन्या चुकांनी रडवलं!

ब्रिटन क्रीडा मंत्र्यांच्या या भूमिकेचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या प्रवक्त्याने समर्थन केले आहे. ओली रॉबिन्सनने केलेले वादग्रस्त आणि आक्षेपार्ह ट्विट हे किशोर वयात केले होते. यासंदर्भात त्याने माफी देखील मागितली आहे, असे सांगत प्रवक्त्याच्या माध्यमातून ब्रिटन पंतप्रधान कार्यालयातून रॉबिन्ससाठी स्टेटड्राइव्ह खेळण्यात आलाय. याचा विचार करुन ईसीबी रॉबिन्सनसंदर्भात घेतलेला टोकाचा निर्णय बदलणार का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.