PM मोदी माझ्या काश्मीरी हिंदू बहिणींची व्यथा ऐका; रैनाने शेअर केला Emotional Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

suresh raina share tweets on kashmiri pandit issue women Emotional Video

मोदी माझ्या काश्मीरी हिंदू बहिणींची व्यथा ऐका; रैनाने शेअर केला Emotional Video

जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी घटना आणि काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या हत्येनंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान माजी क्रिकेटपटू सुरेश रैनानेही काश्मिरी पंडितांशी संबंधित मुद्दा उपस्थित केला आहे. रैनाने व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन केले आहे. रैनाने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना विनंती करतो की माझ्या काश्मिरी हिंदू बहिणीचे हाल ऐकून घ्या. काश्मीरमधील दहशतवाद पीडितांसाठी आपण भारतीयांनी एकत्र उभे राहिले पाहिजे. (Suresh Raina Share Tweets On Kashmiri Pandit Issue Women Emotional Video)

हेही वाचा: ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू Andrew Symondsचा कार अपघातात मृत्यू

सुरेश रैनाने शेअर केलेला व्हिडिओ काश्मिरी पंडितांच्या निदर्शनाचा आहे. त्या व्हिडिओ मध्ये एक महिला रडत असून सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत आहे. एक पुरुष ड्युटीवर जातो आणि संध्याकाळी त्याचा मृतदेह सापडतो, असे म्हणत महिला रडत आहे. ९० च्या दशकातही आमच्यासोबत असेच घडले, आमच्या मुलांचे काय होईल, त्यांनाही आमचा मृतदेह मिळेल का? पुढे या व्हिडीओमध्ये महिला म्हणते की आम्हाला योग्य ट्रान्स्फर-पोस्टिंग मिळत नाही, आम्हाला सुरक्षित ठिकाणी पाठवले जात नाही. आम्ही कसे जगतो हे फक्त आम्हीलाच माहीत आहे.

हेही वाचा: 'हे फक्त एक वाईट स्वप्न असावं...'सायमंड्सची शेवटची इन्स्टा पोस्ट होतीय व्हायरल

जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये दहशतवाद्यांनी सरकारी कार्यालयात घुसून काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांची हत्या केली होती. रुग्णालयात घेऊन जात असताना तेथे त्यांचा मृत्यू झाला. या हत्येनंतर जम्मू-काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काश्मिरी पंडितांकडून सातत्याने आंदोलने केली जात आहेत. मात्र सुरक्षा जवानांनी 24 तासांत राहुल भट्टच्या मृत्यूचा बदला घेतला. राहुल भट्टच्या हत्येमध्ये सहभागी असलेले दहशतवादी चकमकीत मारले गेले. मात्र राहुल भट्ट यांना न्याय मिळावा आणि काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेसाठी सातत्याने निदर्शने केली जात आहेत.

Web Title: Suresh Raina Share Tweet Narendra Modi On Kashmiri Pandit Issue Women Emotional Video

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top