Surya Kumar Yadav : सूर्याने चूक सुधारली! पाचव्या सामन्यात वापरली धोनीची रणनिती अन्...

Surya Kumar Yadav
Surya Kumar Yadav ाेोकोत

Surya Kumar Yadav : भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पाचव्या टी 20 सामन्यात 6 धावांनी विजय मिळवत मालिका 4 - 1 अशी खिशात टाकली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 160 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताने ऑस्ट्रेलियाला 154 धावात रोखले.

चौथ्या सामन्यात शेवटच्या षटकात भारताला 21 धावा डिफेंड करता आल्या नव्हत्या. ते षटक प्रसिद्ध कृष्णाने टाकले होते. मात्र पाचव्या सामन्यात सूर्याने शेवटचे षटक टाकण्यासाठी डेथ ऑव्हर स्पेशलिस्ट अर्शदीप सिंगच्या हातात चेंडू दिला.

शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 10 धावांची गरज होती. मात्र शेवटचं षटक टाकणाऱ्या अर्शदीप सिंगने फख्त 3 धावा देत मॅथ्यू वेडची महत्वाची विकेट घेत भारताला विजय मिळवून दिला. भारताच्या विजयानंतर बोलताना अर्शदीप सिंगने कर्णधार सूर्यकुमार यादवने आजच्या सामन्यात काय सांगितलं होतं याचा उलगडा केला.

Surya Kumar Yadav
Ind vs Sa : आफ्रिकेच्या संघाची घोषणा! टेम्बा बावुमाची कर्णधारपदावरून हकालपट्टी, संघाची धुरा 'या' खेळाडूच्या हातात

अर्शदीप म्हणाला की, सूर्या भाईने आम्हाला संपूर्ण मालिकेत खूप स्वातंत्र्य दिलं होतं. आमच्यावर कोणताही मानसिक दबाव नव्हता. या मालिकेतील जवळपास सर्व सामने हे फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर होत्या. आमच्यासाठी ही खूप आव्हानात्मक परिस्थिती होती. मात्र आमच्या कर्णधाराने आम्हाला रिझल्टच्या बाबतीत न विचार करत प्रोसेसवर लक्ष द्या असं सांगितलं. फलंदाज जिथं चुकतील तिथं आपल्याला फायदा मिळेल असं त्यानं सांगितलं होतं.

अर्शदीप पुढे म्हणाला की, 'या मालिकेत सूर्याने आम्हाला दबाव जाणवू दिला नाही. याचबरोबर मालिकेत त्याने त्याचे विचार आमच्यावर थोपण्याचा देखील प्रयत्न केला नाही. त्याने गोलंदाजांना फक्त आपला प्लॅन सत्यात उतरवण्यासाठी तुमचे 100 टक्के योगदान गरजेचे आहे. आपल्याला चांगली कामगिरी करायची आहे.

Surya Kumar Yadav
WI vs ENG 1st ODI : 325 धावा करून इंग्लंडचा पराभव! कॅरेबियन पॉवरसमोर इंग्लिश गोलंदाजांनी टेकले गुडघे

सूर्यकुमारचे धोनीच्या पावलावर पाऊल

धोनीने देखील आपल्या कारकिर्दीत अनेकवेळा तो निकालाचा विचार करत नाही तर तो प्रोसेसवर भर देतो. जर प्रोसेस योग्य राहिली तरी निकाल देखील आपल्याला हवा तसाच लागणार असा विश्वास त्याला असतो. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या टी 20 मालिकेत पहिल्यांदाच कॅप्टन्सी केली. त्यावेळी त्याने धोनीचा हा कानमंत्र वापरला. सूर्याने कठिण परिस्थितीत देखील आपला संयम सोडला नव्हता.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com