Rishabh Pant: पंतचे सगळे रंग उडाले; आता दिसणार फक्त पांढऱ्या कपड्यात

Team India Rishabh Pant
Team India Rishabh Pantsakal

Team India Rishabh Pant : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी रात्री उशिरा श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे आणि टी-20 मालिकेची घोषणा केली आहे. भारतीय संघ जाहीर झाल्यानंतर एक गोष्ट आश्चर्यचकित होती. या दोन्ही संघात युवा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतचे नाव नव्हते. याआधी पंतला डिस्चार्ज मिळाल्याची शक्यता वर्तवली जात होती, पण आता बातमी आली आहे की पंत दुखापतग्रस्त असून त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जाण्यास सांगण्यात आले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली.

Team India Rishabh Pant
Rohit Sharma : वनडेत रोहितचे कर्णधारपद वाचले, मात्र केएल राहुलचे झाले डिमोशन

टीम इंडियाच्या निवडीबाबत बीसीसीआयने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात पंतला विश्रांती देण्यात आली आहे, की त्याला वगळण्यात आले आहे हे सांगण्यात आलेले नाही. पंत मर्यादित षटकांमध्ये सातत्याने अपयशी ठरत आहे. त्यामुळेच ऋषभ पंतची मर्यादित षटकांची कारकीर्द एकतर संपुष्टात येईल किंवा त्याला काही दिवस विश्रांती घ्यावी लागेल. असा अंदाज वर्तवला जात होता. आता पंत फक्त पांढऱ्या कपड्यात दिसणार हे पाहावे लागेल.

Team India Rishabh Pant
केएल राहुल संघातील स्थान अन् उपकर्णधरापदालाही मुकला; श्रीलंकेविरोधात 'अशी' असेल टीम इंडिया

ऋषभ पंत ज्या प्रकारची फलंदाजी करतो ते पाहता मर्यादित षटकांमध्ये अधिक यशस्वी होईल असे वाटत होते, आणि कसोटी तो ड्रॉ होईल असे सर्वांना वाटत होते. मात्र उलटे झाले आहे. पंत कसोटीत अप्रतिम कामगिरी करत आहे. त्याने अलीकडेच बांगलादेश दौऱ्यावर दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 93 धावा केल्या. त्याने इंग्लंड, ऑस्ट्रेलियात कसोटीत आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.

Team India Rishabh Pant
IND vs SL Yash Dhull : ट्विटरवर धूलचा धुरळा! संजू, इशान नाही तर यश धूलला संधी?

कसोटीतील आकडेवारीवर नजर टाकली तर ऋषभ पंतने 33 सामन्यांत 43.67 च्या सरासरीने 2271 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर कसोटीत पाच शतके आणि 11 अर्धशतके आहेत. त्याच वेळी पंतची वनडेत सरासरी 34.60 आहे. या डावखुऱ्या फलंदाजाची टी-20 मधील सरासरी 22.43 आहे. पंतने मर्यादित षटकांमध्ये सातत्याने निराशा केली आहे. अशा स्थितीत दुखापतीतून सावरल्यानंतर त्याला वनडे आणि टी-20मध्ये स्थान मिळते का हे पाहावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com