FIFA World Cup साठी भारताचा फुटबॉल संघ पात्र झाला होता पण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

FIFA World Cup India Participation

FIFA World Cup साठी भारताचा फुटबॉल संघ पात्र झाला होता पण...

FIFA World Cup India Participation : जगात सर्वात जास्त बघितली जाणारी स्पर्धा म्हणजे फिफा फुटबॉल वर्ल्डकप (Fifa WorldCup) स्पर्धेला कतारमध्ये सुरुवात झाली आहे. मेस्सी, रोनाल्डो, नेमार यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेल्या या स्पर्धेसाठी यंदा ३२ देश पात्र झालेत. पण भारताचे नाव या स्पर्धेत दूर-दूरवर दिसत नाही आहे. असं का? तुम्हालाही हा प्रश्न कधी ना कधी पडला असेलच...आतापर्यंत २२ वेळा फुटबॉल वर्ल्डकपची स्पर्धा झालीय. मात्र भारतीय फुटबॉल संघाला (indian football team) एकदाही या स्पर्धेत क्वालिफाय होता आलेलं नाहीये. पण भारताला या स्पर्धेत खेळण्याची अजिबातच संधी मिळाली नव्हती का? तर असं नाहीये.

हेही वाचा: FIFA World Cup 2022 : स्वित्झर्लंडने विजयाचे खाते उघडले; एम्बोलोने ज्या कॅमेरूनमध्ये जन्म घेतला त्याचाच केला पराभव

1950 मध्ये ब्राझीलमध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत (Fifa WorldCup) भारतीय संघाला सहभागी होण्याचं आमंत्रण मिळालं होतं. मात्र भारतानेच (all india football federation) या स्पर्धेत खेळण्यास नकार दिला. यामागे काही विचित्र गोष्टी कारणीभूत ठरल्या होत्या. कारण या वर्ल्डकपला जेवढी आता प्रसिद्धी मिळते तेवढी त्याकाळी मिळत नव्हती, शिवाय ऑलिम्पिक स्पर्धेमध्येही फुटबॉलचा समावेश असल्यामुळे भारताच्या फुटबॉल महासंघाने ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेण्याच्या नावाने पैसे वाचविण्याचं कारणं देत या स्पर्धेत भाग घेण्यास नकार दिला.

तर या स्पर्धेत भाग न घेण्यामागे आणखी एक हास्यास्पद कारणसुद्धा दिलं जाते. ते म्हणजे भारतीय फुटबॉलपटूंना अनवाणी खेळण्याची सवय होती. मात्र फुटबॉल वर्ल्डकपमध्ये शूज न घालता खेळण्याची परवानगी मिळत नसल्याने भारताने या स्पर्धेतवर बहिष्कार टाकला. आता हे दुसरं कारण कितपत खरं आहे हे कोणालाच माहित नाही पण त्यानंतर आजपर्यंत तब्बल १३० कोटी लोकसंख्या असलेल्या भारताला एकाही वर्ल्डकप स्पर्धेसाठी पात्र होता आलेलं नाहीये.

हेही वाचा: FIFA World Cup 2022 : दक्षिण कोरियाचा स्टार स्ट्रायकर का घालणार आहे 'काळा मास्क'

बायचुंग भुतिया असो किंवा सुनील छेत्री, भारताच्या प्रत्येक खेळाडूने आपल्या देशाला फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये खेळता यावं यासाठी भरपूर प्रयत्न केले. मात्र पात्र होण्याचं तर सोडाच पण त्याआधी होणाऱ्या पात्रता फेरीमध्येही भारताला चांगली कामगिरी करता आलेली नाही आहे. दर चार वर्षांनी जेव्हा हा फुटबॉलचा हा कुंभमेळा भरतो तेव्हा 1950 ला झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत सहभाग न घेता केलेली भारताची ती चूक नेहमी लक्षात राहते.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार...