Suryakumar Yadav IND vs SL : सूर्याला वगळलं! केएल राहुलला संघात बसवण्यासाठी दोघांवर झाला अन्याय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suryakumar Yadav IND vs SL 1st ODI

IND vs SL : सूर्याला वगळलं! केएल राहुलला संघात बसवण्यासाठी दोघांवर झाला अन्याय

Suryakumar Yadav IND vs SL 1st ODI : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने पहिल्या सामन्यासाठी संघा जाहीर केला त्यावेळी सूर्यकुमार यादवला संघात स्थान न दिल्याबद्दल सर्वांनाच आश्चर्यचा धक्का बसला. सूर्यकुमार यादवने नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात 112 धावांची नाबाद शतकी खेळी केली होती. मात्र तरी देखील त्याला संधी देण्यात आलेली नाही.

भारताने श्रीलंकेविरूद्धच्या टी 20 मालिकेत आपला नवखा संघ उतरवला होता. या संघाकडून सूर्यकुमार यादवने दमदार कामगिरी केली. त्याने तिसऱ्या सामन्यात 51 चेंडूत 112 धावांची खेळी करत आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं होतं. त्यातच त्याची टी 20 संघाचा उपकर्णधार म्हणून बढती झाल्याने तो लंकेविरूद्धच्या वनडे मालिकेत देखील संघात असलेच अशी अशा होती.

हेही वाचा: IND vs SL 1st ODI LIVE : श्रीलंकेने नाणेफेक जिंकली; भारताची आश्चर्यकारक संघनिवड

मात्र पहिल्या वनडेत ब्रेकनंतर संघात परतलेल्या वरिष्ठ खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे बांगलादेश दौऱ्यावर तिसऱ्या वनडे सामन्यात द्विशतकी खेळी करणारा इशान किशन, टी 20 मध्ये दमदार शतक ठोकणारा सूर्यकुमार यादव या दोघांनीही बेंचवर बसावे लागले. रोहित शर्माने पहिल्या वनडे सामन्यात सलामीवीर म्हणून शुभमन गिलला संधी दिली आहे. त्यामुळे इशान किशनचा पत्ता कट झाला.

हेही वाचा: IND vs SL ODI: रोहितने घेतला कठोर निर्णय! 'या' खेळाडूचे करियर वाचवण्यासाठी दिला मोठा बळी

याचबरोबर रोहित शर्माने खराब फॉर्ममधून जाणाऱ्या केएल राहुलला देखील पहिल्या सामन्यात संधी देण्याचा निर्णय घेतला. पार्टटाईम विकेटकिपर असलेल्या केएल राहुलच पंतच्या अनुपस्थितीत विकेट किपिंगची जबाबदारी उचलणार आहे. राहुल चौथ्या, पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरले. यामुळे सूर्यकुमार यादवची संघातील जागा गेली. एका केएल राहुलमुळे दोन इन फॉर्म बॅट्समनवर गदा आली आहे.

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त