Team India Injury | IND vs NZ : टीम इंडियाला मोठा धक्का; स्टार फलंदाज मालिकेबाहेर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Team-India

IND vs NZ : टीम इंडियाला मोठा धक्का; स्टार फलंदाज मालिकेबाहेर

IND vs NZ Test : 'टीम इंडिया'ला टेस्ट मालिकेआधी मोठा धक्का बसला असून स्टार फलंदाज लोकेश राहुल हा दुखापतीमुळे मालिकेबाहेर झाला. त्याच्या जागी मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवला संघात बदली खेळाडू म्हणून समाविष्ट करण्यात आल्याची माहिती BCCI ने ट्विट करत दिली. भारतीय संघाने न्यूझीलंड विरूद्धची टी२० मालिका ३-०ने जिंकली. पहिल्या दोन सामन्यात आव्हानाचा पाठलाग करताना तर तिसऱ्या सामन्यात आव्हानाचा बचाव करताना टीम इंडियाने मालिकेत बाजी मारली. आता न्यूझीलंड विरूद्ध भारतीय संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पहिल्या सामना २५ ते २९ नोव्हेंबर आणि दुसरा सामना ३ ते ७ डिसेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. संपूर्ण कसोटी मालिकेसाठी रोहित शर्माला आणि पहिल्या सामन्यासाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. तशातच आता लोकेश राहुलही दुखापतीमुळे मालिकेबाहेर झाल्याने टीम इंडियासाठी हा मोठा धक्काच मानला जात आहे. (Suryakumar Yadav replaces KL Rahul in India's Test squad)

भारताचा धडाकेबाज खेळाडू लोकेश राहुल याच्या स्नायूंना दुखापत झाली. त्याच्या डाव्या मांडीचे स्नायू दुखावले गेले. त्यामुळे त्याला आगामी भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली. आता तो दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जाऊन योग्य उपचार आणि सराव करेल आणि त्यानंतरच आगामी दौऱ्यासाठी निवडीला पात्र ठरेल. त्याच्या जागी वरिष्ठ संघाच्या निवड समितीने सूर्यकुमार यादवची निवड केली आहे. २५ तारखेपासून पहिली कसोटी खेळली जाणार आहे, अशी माहिती BCCIच्या पत्रकात देण्यात आली.

भारताचा कसोटी संघ (Team India Test Squad)

अजिंक्य रहाणे (कर्णधार), मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविंद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा

loading image
go to top