WI vs IND 3rd T20I : सलामीवीर सूर्याची बॅट तळपली; मालिकेत भारताची आघाडी

Suryakumar Yadav Shine India Defeat West Indies In 3rd T20I
Suryakumar Yadav Shine India Defeat West Indies In 3rd T20Iesakal
Updated on

WI vs IND 3rd T20I : वेस्ट इंडीजने भारतासमोर ठेवलेल्या 165 धावांचे आव्हान भारताने 19 षटकात 3 विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. भारताकडून सलामीवीर सूर्यकुमार यादवने (Surya Kumar Yadav) धडाकेबाज फलंदाजी करत 44 चेंडूत 78 धावा केल्या. त्याला श्रेयस अय्यरने 24 तर ऋषभ पंतने नाबाद 33 धावा करून चांगली साथ दिली. या विजयाबरोबरच भारताने मालिकेत 2 - 1 अशी आघाडी घेतली आहे.

Suryakumar Yadav Shine India Defeat West Indies In 3rd T20I
Yuzvendra Chahal :युझवेंद्र चहलचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक; प्रायव्हेट चॅट झाले लीक

वेस्ट इंडीजचे 165 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने धडाकेबाज सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) एक षटकार एक चौकार मारत 5 चेंडूत 11 धावा केल्या. मात्र एक फटका मारताना त्याचा पाठीचा स्नायू दुखावला. त्यामुळे त्याला रिटायर्ड हर्ट होऊन मैदान सोडावे लागले.

यानंतर सूर्यकुमार यादवने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत आक्रमक फलंदाजी करण्यास सुरूवात केली. त्याला दुसऱ्या बाजूने श्रेयस अय्यर सावध फलंदाजी करत साथ देत होता. या दोघांनी भारताला 12 व्या षटकात शतक पार करून दिले.

मात्र अकील हुसैनने श्रेयस अय्यरला 24 धावांवर बाद करत भारताला दुसरा धक्का दिला. त्यानंतर ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादवने भारताला 135 धावांपर्यंत पोहचवले. मात्र सामना अवाक्यात आला असताना सूर्यकुमार यादव 44 चेंडूत 78 धावा करून बाद झाला.

सूर्यकुमार बाद झाल्यानंतर पंतने हार्दिक पांड्यासोबत सामना संपवण्यासाठी भागादारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र हार्दिक 4 धावांची भर घालून माघारी गेला. पांड्या बाद झाल्यानंतर आलेल्या दीपक हुड्डाने पंतला चांगली साथ देत नाबाद 10 धावा केल्या. ऋषभ पंतने अखेर चौकार मारत सामना संपवला. भारताने सात विकेट राखून विंडीजला मात देत मालिकेत 2 - 1 अशी अघाडी घेतली.

Suryakumar Yadav Shine India Defeat West Indies In 3rd T20I
Lawn balls : भारताने सुवर्ण जिंकलेला लॉन बॉल्स खेळतात तरी कसा?

तत्पूर्वी, भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडीजने 20 षटकात 5 बाद 164 धावा केल्या. वेस्ट इंडीजकडून सलामीवीर कायल मेयर्सने 50 चेंडूत दमदार 73 धावा केल्या. त्याला इतर फलंदाजांनी 20 -25 धावांची छोटेखानी खेळी करत साथ देण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com