Yuzvendra Chahal :युझवेंद्र चहलचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक; प्रायव्हेट चॅट झाले लीक

Yuzvendra Chahal Instagram Account Hacked By Rajasthan Royals
Yuzvendra Chahal Instagram Account Hacked By Rajasthan Royalsesakal

नवी दिल्ली : टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहलचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. त्याच्या अनेक खासगी चॅटचे स्क्रीन शॉट देखील पब्लिक करण्यात आले आहेत. हा कारनामा करणाऱ्यांनी जाहिररित्या याची घोषणा देखील केली. इंडियन प्रीमियर लीगमध्ये चहल राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळतो. राजस्थान रॉयल्सच्या सोशल मीडिया टीमनेच हा कारनामा केला आहे. आयपीएल 2022 दरम्यान चहलने राजस्थान रॉयल्सचे अकाऊंट हॅक करून संघातील खेळाडूंना मॅसेज केले होते. राजस्थान रॉयल्सच्या सोशल मीडिया टीमने याचा बदला आता घेतला. (Yuzvendra Chahal Instagram Account Hacked By Rajasthan Royals)

Yuzvendra Chahal Instagram Account Hacked By Rajasthan Royals
Lawn balls : भारताने सुवर्ण जिंकलेला लॉन बॉल्स खेळतात तरी कसा?

विशेष म्हणजे हे सर्व चेष्टेत सुरू होते. राजस्थान रॉयल्सने चहलच्या ज्या इन्स्टा चॅटचे स्क्रीनशॉट व्हायरल केले त्यात पत्नी धनश्री वर्मा, संजू सॅमसन, महेंद्रसिंह धोनी, जॉस बटलर, इंडियन क्रिकेट टीम आणि रोहित शर्माच्या अकाऊंटवरून आलेले शेवटचे मॅसेज दिसतात.

या चॅटमध्ये युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री लिहीते की, 'तुम्ही आमच्या व्हिडिओत परत या.' तर धोनी लिहितो की, 'खूप चांगले चहल' मात्र या सर्वांमध्ये रोहित शर्माने मजेदार चॅट केले आहे. तो लिहितो की, 'अकाऊंट डिलीट करू टाक.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com